जि.प.बालविकास अधिकार्‍यांची सीईओंकडून‘अश्‍लिल’ भाषेत खरडपट्टी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2018
Total Views |

दालनात उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, आर.जी.पाटील यांची होती उपस्थिती

 
जळगाव :
मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेमधील अतिशय महत्त्वाचा विभाग असलेल्या महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी रफीक रुबाब तडवी यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी आपल्या स्वत:च्या दालनात बोलावून ‘वर्क कॅलेंडर’ तयार केले का? असे विचारले असता आर.आर.तडवी यांनी तयार नाही झाले, असे सांगितले. यानंतर सीईओ दिवेकर यांनी अतिशय अशोभनीय ‘अश्‍लिल’ भाषेत दालनात उपस्थित असलेल्या सर्वांसमोर खरडपट्टी काढून अपमानास्पद वागणूक दिली. याबाबत बालविकास अधिकारी आर.आर.तडवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
 
 
महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आर.आर.तडवी हे गेल्या जून २०१७ पासून या पदावर कार्यरत आहे. तडवी हे भिल्ल या अनु.जमाती मधील असून धार्मिकदृष्ट्या अल्पसंख्यांक गटातील आहे. सोमवारी, १४ रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी शासकीय कामकाजानिमित्त आर.आर.तडवी यांना स्वत:च्या दालनात बोलावून घेतले. सीईओ यांच्या दालनात अति.मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, आर.जी.पाटील यांच्यासह इतर नागरिक दालनात उपस्थित होते.
 
 
यावेळी सीईओ दिवेकर यांनी महिला बालविकास अधिकारी आर.आर.तडवी यांना विचारले की, तुम्ही ‘वर्क कॅलेंडर’ तयार केले का? असा प्रश्‍न केला. त्यावर तडवी यांनी नम्रपणे सांगितले की, मी अद्यापपर्यंत ‘वर्क कॅलेंडर’ तयार केले नाही. या उत्तराने सीईओ दिवेकर यांना राग येवून ‘तुम्ही काय काम करतात मग.... असा अश्‍लिल, आक्षेपार्ह शब्दप्रयोग करुन सर्वांसमोर अपमानास्पद वागणूक दिल्याचे आर.आर.तडवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
 
निवेदनाच्या प्रती आयुक्तांना पाठविल्या
महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आर.आर.तडवी यांनी सीईओ शिवाजी दिवेकर यांच्याबद्दल लेखी तक्रार पोलीस अधीक्षक जळगाव, शहर पोलीस स्टेशन, आयुक्त महिला व बालविकास विभाग पुणे, आयुक्त एबाविसेयो मुंबई यांच्याकडे रवाना केले आहे.
 
अश्‍लिल भाषेचा प्रयोग केला नाही...
अश्‍लिल शब्दाचा दुर्दैवी शब्दप्रयोग मी केलाच नाही. माझ्यासमोर एसीओ संजय मस्कर, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि.प.सदस्य उपस्थित होते. त्यांच्यासमोर मी असे बोलूच शकत नाही. आर.आर.तडवी यांच्याकडील कामांच्या आढावा संदर्भात मी विचारणा केली. उद्या आढावा बैठक असल्याचे सांगितले. त्या बैठकीत महिला बालकल्याणचा आढावा द्यावा लागणार असल्याची त्यांना फक्त विचारणा केली. त्यामुळे त्यांना अश्‍लिल बोलल्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
- शिवाजी दिवेकर,
सीईओ, जिल्हा परिषद, जळगाव
 
@@AUTHORINFO_V1@@