जेडी(एस)ची कॉंग्रेसला टाळी, ५.३० वाजता चर्चा होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2018
Total Views |

 
 
बंगळूरू : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. आज दुपारपर्यंतच्या एकूण निकालावरून भारतीय जनता पक्ष हा बहुमताकडे वाटचाल करत असून राज्यातील सर्वाधिक जागा या भाजपकडे आहेत. दरम्यान दुसऱ्या स्थानावर कॉंग्रेस पक्षाला आला असून त्यानंतर देवीगौडाचा जनता दल (एस) हा तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. मात्र आता जेडी(एस) ने काँग्रेसच्या ऑफरवर विचार करत संध्याकाळी ५.३० वाजता काँग्रेसशी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कर्नाटकचा निकाल हा शेवट पर्यंत अटीतटीचा सामना आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. याबाबतीत पुढे काय होतं. जे डी(एस) आणि काँग्रेसमध्ये काय चर्चा होते, व त्याचे काय परिणाम होतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. 
दरम्यान बहुमतापासून दूर असलेल्या कॉंग्रेस पक्षाने आता एक नवीन राजकीय खेळी सुरु केली असून कॉंग्रेसने गौडा यांच्या जेडी(एस)ला सत्तास्थापनेची ऑफर दिली आहे. तसेच जेडी(एस)ला कॉंग्रेस पूर्णपणे पाठींबा देईल, असे आश्वासन कॉंग्रेसने दिले आहे. कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील याविषयी माध्यमांना माहिती दिली असून यासंबंधी गौडा यांच्याशी फोनद्वारे देखील चर्चा झाल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
माध्यमांशी बोलताना सिद्धरामय्या यांनी कॉंग्रेस पक्ष हा जनतेच्या मतांचा आदर करणारा पक्ष असून जनतेनी दिलेला कौल आम्हाला मान्य असल्याचे म्हटले. तसेच कॉंग्रेसकडे सध्या तरी राज्यात सत्ता स्थापन करण्याइतपत जागा जमा झालेल्या नाहीत. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने जेडी(एस)ला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असून याविषयी चर्चा सुरु आहे. जेडी(एस)लाने आपला प्रस्ताव स्वीकारल्यास ४ वाजता सिद्धरामय्या हे राज्यपालांची भेट घेणार असल्याचे कॉंग्रेसने स्पष्ट केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@