पुणे : येत्या पाच दिवसांमध्ये गोव्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे. गोवा, कोकण, मराठवाडा आणि विदर्भासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होईल तसेच विदर्भसह काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे.
आज सकाळीची पुणे हवामान खात्याने येत्या आठवड्याभराचा हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये आज गोव्यासह राज्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये अर्थात १५ आणि १६ तारखेला विदर्भासह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल व उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. तसेच त्यानंतर १७ आणि १८ तारखेला कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान पुण्यात मात्र येत्या आठवडाभर आकाश निरभ्र राहील असे देखील हवामान खात्याने सांगितले आहे.
पुणे हवामान खात्याचे बातमीपत्र :