सुनंदा पुष्कारांच्या हत्येमागे शशी थरूर ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2018
Total Views |

दिल्ली पोलिसांकडून चार वर्षांनंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल




नवी दिल्ली : ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व माजी परराष्ट्र मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. तब्बल चार वर्षांच्या तपासानंतर पोलिसांनी पटियाला न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले असून हे आरोपपत्र कलम ३०६ आणि ४९८अ नुसार दाखल करण्यात आले आहे. याचा अर्थ पुष्कर यांचा मृत्यू हा आत्महत्येमुळेचा झाला असून त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले होते. दरम्यान हे आरोपपत्र नेमके कोणाविरोधात दाखल करण्यात आले आहे, हे मात्र असून स्पष्ट झालेले नाही. परंतु सोशल मिडीयावर मात्र यासंबंधी एका वेगळ्याच चर्चेला पेव फुटले असून हे आरोपपत्र थरूर यांच्या विरोधातच दाखल करण्यात आल्याची चर्चा सोशल मिडीयावर सुरु झाली आहे.

तब्बल चार वर्षांच्या तपासानंतर दिल्ली पोलिसांनी आज ३ हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रामध्ये पोलिसांनी कलम ३०६ आणि ४९८अ या दोन कलमांचा समावेश केला आहे. जेणे करून पुष्कर यांना त्यांच्या सासरच्या व्यक्तींकडून आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले होते, हे सिद्ध होते. तसेच या प्रकरणाच्या सुरुवातीलाच पुष्कर आणि त्यांचे पती थरूर यांच्यात मृत्यू अगोदर मतभेद सुरु होते, असे समोर आले होते. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या या आरोपपत्रानंतर संशयाच्या सर्व सुया थरूर यांच्याकडे फिरत आहेत. दरम्यान लवकरच न्यायालय याविषयी सुनावणी करणार असून न्यायालय आपल्या सुनावणीमध्ये काय निर्णय देणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.




काय आहे हे प्रकरण ?

सुनंदा पुष्कर या थरूर यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. ऑक्टोंबर २००९ मध्ये त्यांची एका कार्यक्रमामध्ये थरूर यांच्याशी भेट झाली होती. यानंतर २०१० मध्ये त्यांनी थरूर यांच्याशी मल्याळम पद्धतीने तिसऱ्यांदा विवाह केला होता. यानंतर २०१४ पर्यंत तो दोघेही एकत्र राहिले. परंतु याकाळामध्ये दोघांमध्ये सातत्याने मतभेद होत असल्याचे समोर येत होते. तसेच काही आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये देखील पुष्कर यांचे नाव आले होते. यानंतर १७ जानेवारी २०१४ मध्ये दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा गूढरित्या मृत्यू झाला होता. यावर थरूर यांनीच पोलिसांमध्ये तक्रार दाखल करत पुष्कर यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले होते. .

@@AUTHORINFO_V1@@