अमेरिकेत ज्वालामुखीने घातले थैमान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
अमेरिका : अमेरिकेतील हवाई येथे सक्रीय ज्वालामुखी फुटल्याने आसपासच्या गावांमध्ये या ज्वालामुखीच्या फुटण्याचे उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. किलाएवा असे या ज्वालामुखीचे नाव असून याच्या फुटण्याने संपूर्ण जंगल आणि आसपासचे गावं जळून खाक होत चालली आहेत. हा ज्वालामुखी मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे, यामुळे आसपासच्या दुसऱ्या ठिकाणावरील ज्वालामुखींचा देखील उद्रेक होत आहे. 
 
 
 
 
या ज्वालामुखीमुळे अनेक नागरिकांना आपले घर सोडावे लागले तर काही नागरिकांची घरे या ज्वालामुखीखाली आली आहेत. हवाई येथील किलाएवा हा सर्वात मोठा सक्रीय ज्वालामुखी आहे. या ज्या ठिकाणाहून हा फुटला आहे त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात लावा सध्या बाहेर निघत असून हा लावा संपूर्ण गावांमध्ये शिरत आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@