प.बंगाल निवडणुकांमध्ये टीएमसीच्या गुंडांचा हैदोस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2018
Total Views |

मतदान केंद्रांचा घेतला ताबा; हिंसाचारात चार जणांचा मृत्यू 

माध्यम प्रतिनिधींना देखील मारहाण 




कोलकत्ता :
दोन महिन्यापासून प्रलंबित राहिलेल्या पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकांना आज सकाळपासून राज्यातील विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली असतानाच, अपेक्षेप्रमाणे तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी हिंसाचार आणि जाळपोळ करण्यास सुरुवात केली आहे. टीएमसीच्या या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. तसेच काही माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील या गुंडांकडून मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याचा परिणाम मतदानावर होत असल्याचे दिसून येत आहे.

काल मध्यरात्रीपासूनच टीएमसीच्या गुंडांकडून जाळपोळ आणि हिंसाचार केला जात आहे. भाजप आणि कम्युनिस्ट पक्षांच्या काही नेत्यांना लक्ष करून टीएमसीकडून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. काल मध्यरात्री नॉर्थ २४ परगणामध्ये असलेल्या एक सीपीआयएमच्या कार्यकर्त्याच्या घराला आग लावण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी भानगड येथील मतदान केंद्रांवर जाऊन टीएमसी कार्यकर्त्यांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी मतदानाला जात असलेल्या नागरिकांना देखील अडवून त्यांना मारहाण करण्यात आली तसेच मतदानकेंद्रांवर प्रवेश देण्यास नकार दिला. यानंतर याठिकाणी आलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील या गुंडांनी मारहाण करून त्यांच्या कॅमेऱ्यांची तोडफोड केली. तसेच वाहनांची देखील जाळपोळ केली.

दरम्यान कार्यकर्त्यांबरोबरच टीएमसीच्या मंत्र्यांनी देखील जाहीरपणे आपल्या गुंडपणाचे प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. नाथाबरी येथे टीएमसीचे मंत्री रवींद्रनाथ घोष यांनी मतदान केंद्रावर एका भाजप कार्यकर्त्याला मारहाण करत त्याला मतदान केंद्राबाहेर हाकलून दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये त्याठिकाणी तैनात असलेल्या पोलीस आणि टीएमसीच्या कार्यकत्यांनी देखील घोष यांना मदत केली. या घटनेचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मिडीयावर वायरल होत आहे.








दरम्यान या प्रकारावर टीएमसीच्या अध्यक्षा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी मात्र मुग गिळून गप्प बसल्या आहेत. ममता यांचा या भुमिकेमुळे सोशल मिडीयावर मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात असून आता लोकशाही धोक्यात नाही का ? असा संतप्त सवाल अनेकांकडून विचारला जात आहे.



 
@@AUTHORINFO_V1@@