१२ जणांचा बळी घेत प. बंगालची निवडणूक संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2018
Total Views |

तृणमूलच्या गुंडांचा मतदानात हिंसाचार

दिवसभरात ७३ टक्के मतदानाची नोंद



कोलकत्ता : तब्बल १२ जणांचा बळी घेत पश्चिम बंगालच्या पंचायत निवडणुका अखेरकार समाप्त झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या हिंसाचारसह सकाळी ७ वाजता सुरु झालेले मतदान आज संध्याकाळी ५ वाजता संपले असून संपूर्ण राज्यात एकूण ७३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. तर हिंसाचारामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक नागरिक जखमी झाले असल्याचे समोर आले आहे.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असताना देखील तृणमूलच्या गुंडांनी राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचार केला. अनेक ठिकाणी मतदारांवर देखील हल्ले करण्यात आल्यामुळे दुपारी २ वाजेपर्यंत मतदानावर थोडा परिणाम झाला होता. परंतु दुपारनंतर मात्र नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभाग घेत मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. यानंतर मात्र काही मोजकी ठिकाणे सोडली तर बऱ्यापैकी भागात मतदान व्यवस्थितपणे पार पडले.

काल मध्यरात्रीपासूनच टीएमसीच्या गुंडांकडून जाळपोळ आणि हिंसाचार केला जात होता. राज्यातील विविध मतदानकेंद्राचा ताबा घेत भाजपच्या कार्यकर्त्यांवर तसेच उमेदवारांनावर हल्ले केले जात होते. यामध्ये भाजपच्या एक महिला उमेदवार देखील जखमी झाल्या आहेत. याचबरोबर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी़ंवर देखील हल्ला करून एकूण ५ जणांना जखमी करण्यात आले होते.


कार्यकर्त्यांबरोबरच टीएमसीच्या मंत्र्यांनी देखील जाहीरपणे आपल्या गुंडपणाचे प्रदर्शन करण्यास केले होते. नाथाबरी येथे टीएमसीचे मंत्री रवींद्रनाथ घोष यांनी मतदान केंद्रावर एका भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली होती. तसेच पोलिसांनी देखील त्यांना यामध्ये मदत केली होती. दरम्यान या प्रकारावर टीएमसीच्या अध्यक्षा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी मात्र कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याची देखील तसदी घेतली नाही. परंतु सोशल मिडीयावर मात्र ममता यांच्या या भूमिकेवर अनेकांकडून जोरदार टीका करण्यात आली. भारतीय जनता पक्षाने देखील यावर संताप व्यक्त करत, ममता आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@