दलितांसाठी पद सोडण्यास तयार : सिद्धरामय्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2018
Total Views |

 
 
म्हैसूर : 'पक्ष जर एखाद्या दलित उमेदवारास मुख्यमंत्री बनविणार असल्यास मी आपल्या पदाचा त्याग नक्की करेल' असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले आहे. म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे विधान केले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले कि', पक्षाअंतर्गत जर एखाद्या दलित उमेदवाराला मुख्यमंत्री पद देण्याचा विचार होत असलेल तर ती अत्यंत कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. तसेच जर कॉंग्रेस कर्नाटकात बहुमताने विजयी झाली आणि जर दलित उमेदवारास पद देण्याचा निर्णय झालास तर आपण आपल्या पदाचा त्याग करण्यास देखील तयार आहोत, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान सिद्धरामय्या यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. कॉंग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान सिद्धरामय्या हेच कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असे जाहीर केले होते, परंतु आता मात्र या पदासाठी एका दलित चेहऱ्याला संधी देण्याविषयी पक्षात चर्चा सुरु झाली आहे. तसेच भाजपचा गोवा पॅटर्न वापरत कॉंग्रेस लोकसभेचे खासदार मल्लिकार्जुन खड्गे यांना मुख्यमंत्री बनवण्याची शक्यता काही जणांकडून वर्तवली जात आहे, त्यामुळे सिद्धरामय्या यांच्या वक्तव्याची सध्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@