प. बंगाल निवडणुकांना ५९ हजार सुरक्षा रक्षकांचे संरक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2018
Total Views |

उद्या होणार पंचायत निवडणुका



कोलकत्ता : गेल्या दोन महिन्यापासून प्रलंबित असलेल्या पश्चिम बंगालच्या पंचायत निवडणुका आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे उद्या सकाळी या निवडणुकांसाठी मतदानाला प्रारंभ होणार असून सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून एकूण ५९ हजार ५०० सुरक्षा रक्षक संपूर्ण राज्यभरात तैनात करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने आज स्पष्ट केले आहे.
राज्यातील एकूण ६२१ जिल्हा परिषद, ६ हजार १५७ पंचायत समिती आणि ३१ हजार ८२७ ग्रामपंचायतींमधील मतदानकेंद्रावर उद्या सकाळपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. यासर्व मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कडक बंदोबस्त करण्यात आला असून प. बंगाल राज्य पोलीस तसेच दुसऱ्या राज्यातून सुरक्षा रक्षक राज्यात तैनात करण्यात येणार आहेत. यासाठी म्हणून प.बंगालचे पोलीसांचे ४६ हजार तर कोलकत्ता पोलिसांचे १२ हजार पोलीसकर्मी राज्यात तैनात करण्यात येणार आहेत. तसेच शेजारील राज्यातून १ हजार ५०० सुरक्षा रक्षक राज्यात तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे एक प्रकारे उद्या सर्व राज्यालाच लष्करी छावणीचे स्वरूप पप्राप्त होणार आहे.
दरम्यान राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल कॉंग्रेसने उद्या निवडणुकांमध्ये आपलाच विजय होणार असल्याचे दावा केला आहे. तर प्रदेश भाजपने जनता आपल्या बाजूने कौल देणार असल्याचे विश्वास व्यक्त केला आहे. तृणमूलकडून लोकशाही विरोध केलेल्या हिंसाचारात भाजपचे आतापर्यंत ५२ कार्यकर्ते मारले गेलेले आहेत, त्यामुळे जनताच तृणमूलला त्यांच्या कर्माची शिक्षा देईल, असे देखील भाजपने म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@