टिळकांच्या अपमानावर प्रकाशकांनी मागितली माफी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2018
Total Views |
 

मथुरा : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 'दहशतवादाचे जनक' म्हणून शालेय पुस्तकात करण्यात आलेल्या उल्लेखासंबंधी पुस्तक प्रकाशकांकडून आज जाहीररित्या माफी मागण्यात आली आहे. मथुरा येथील स्टुडन्ट अॅडवायजर पब्लिकेशन्स प्रा.लि. या कंपनीकडून याविषयी जाहीररीत्या माफी मागण्यात आली असून लवकरच पुस्तकामधील हि चूक दुरुस्त केली जाईल, असे आश्वासन देखील कंपनीकडून देण्यात आले आहे.

कंपनीने वृत्तपत्रामध्ये याविषयी जाहीरात देऊन जाहीर माफी मागितली आहे. 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा 'दहशतवादाचे जनक' म्हणून करण्यात आलेल्या उल्लेखाविषयी आपण माफी मागत असून कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे हे छापले गेले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पुस्तकांच्या नव्या आवृत्तीमध्ये ही चूक दुरुस्त केली जाईल, असे देखील याकंपनीकडून सांगण्यात आले आहे.


राजस्थानच्या इंग्रजी माध्यमातील आठवीच्या पुस्तकामध्ये लोकमान्य टिळकांचा उल्लेख 'दहशतवादाचे जनक' असा करण्यात आला होता. काल हे वृत्त सोशल मिडीयावर वायरल झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. राजकीय पक्षांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनीच राजस्थान सरकारवर टीकेची झोड उठवली होती. यानंतर या पुस्तकांची छपाई करणाऱ्या या कंपनीच्या ध्यानात देखील ही चूक आली व त्यांनी याविषयी जाहीर माफी मागितली. परंतु नागरिक आणि राजस्थान सरकार मात्र ही माफी मान्य करणार का ? याविषयी मात्र अजून साशंकता व्यक्त केली जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@