देर आये दुरुस्त आये : निर्मला सीतारामन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली :  "२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा हात होता, या विषयी जेव्हा पाकिस्तानचे पूर्व प्रधानमंत्री नवाज शरीफ यांनी माहिती दिली, त्याबद्दल आम्हाला आश्चर्य नाही झाले, देर आये दुरुस्त आये म्हणतात ना ते पाकिस्तानच्या बाबतीत खरंच आहे." अशा भावना भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केल्या. काल नवाज शरीफ यांनी केलेल्या वक्तव्यावर पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना त्या आज बोलत होत्या.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काल मोठ्ठा खुलासा केला. २६/११ ला झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता अशी माहिती त्यांनी दिली. पाकिस्तानमधील वृत्तपत्र ‘डॉन’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वरील खुलासा केला आहे. दहशतवाद्यांना समर्थन दिल्यामुळे आज पाकिस्तान वेगळा झाला आहे आणि पाकिस्तानची प्रगती खुंटली आहे असेही त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना सीतारामन यांनी आपल्याला याविषयी काहीच आश्चर्य वाटले नाही. ज्यावेळी हे झाले तेव्हा पासूनच भारताला पाकिस्तानवर दाट संशय होता, आणि आज त्यांनी स्वत:च याचा कबुलीजवाब दिला. त्यामुळे याची अपेक्षा होतीच, असे म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@