तंत्र शिक्षण मंडळाची शैक्षणिक प्रमाणपत्रे ऑनलाईन जतन होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2018
Total Views |


 

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा सीडीएसएल व्हेंचर लिमिटेडशी सामंजस्य करार



मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व पदविका प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे राष्ट्रीय शैक्षणिकमडिपॉझिटरीवर डिजीटल पद्धतीने नोंदणी करुन जतन करुन ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भात शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सीडीएसएल व्हेंचर लिमिटेडशी सामंजस्य करार करण्यात आला.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय व विश्वविद्यालय अनुदान आयोग यांच्या डिजीटल इंडियाच्या धोरणानुसार नऊ लाख शैक्षणिक प्रमाणपत्रे राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीवर डिजीटल पद्धतीने नोंदणी करुन जतन करुन ठेवण्यात येणार आहेत. प्रमाणपत्रातील माहितीची सत्यता, सचोटी, गोपनीयता व सुरक्षतेची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. तसेच या सेवेद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्राची डिजीटल अथवा प्रिंटेड कॉपी विनासायास उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच सर्व संबंधित भागधारक व सत्यापकांना राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीमार्फत विद्यार्थ्यांच्या संमतीने ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रमाणपत्रांची सत्यता तात्काळ पडताळून पाहणे शक्य होणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@