शिंदखेडा तालुक्यात ७ ग्रामपंचायत निवडणूकीच्या ६३ सदस्यांसाठी १९० तर सरपंचसाठी ३९ अर्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2018
Total Views |
 
 
शिंदखेडा, १२ मे :
शिंदखेडा तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी सात जागांसाठी ३९ अर्ज दाखल झाले असुन सदस्यपदासाठी ६३ जागांसाठी १९० नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
 
 
शनिवारी शेवटची मुदत असल्याने तहसिल कार्यालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या टप्प्यात ७ ग्रामंपचायतीच्या निवडणुका होत असून यात वालखेडा, कंचनपुर, वाघोदे, कदाणे, तावखेडा प्र.बे, परसामळ, साळवे या ग्रामपंचायतीसाठी निवडणुक होत आहे
 
 
परसामळ-कुमरेज प्रभाग कर १ मध्ये ३ जागांसाठी ७ नामनिर्देशन पत्र, प्रभाग क्र .२ ३ जागांसाठी ६ नामनिर्देशन पत्र, प्रभाग क्र ३ मध्ये ३ जागांसाठी ७ अर्ज, सरपंच पदासाठी ४ अर्ज, कंचनपूर प्रभाग क्र १ मध्ये ३ जागांसाठी ७ अर्ज, प्रभाग क्र २ मध्ये ३ जागांसाठी १३ अर्ज.प्रभागे क्र ३ मध्ये ३ जागांसाठी १२ अर्ज, सरपंच पदासाठी ६ अर्ज, कदाणे येथे प्रभाग १ मध्ये ३ जागांसाठी १० अर्ज, प्रभाग क्र २ मध्ये ३ जागांसाठी १० अर्ज ३ मध्ये ३ जागांसाठी ६ अर्ज, सरपंच पदासाठी ५ अर्ज, तावखेडा प्र.बे. प्रभाग १ मध्ये ३ जागांसाठी ९ अर्ज, प्रभाग २ मध्ये ३ जागांसाठी ११ अर्ज, प्रभाग ३ मध्ये ३ जागांसाठी ५ अर्ज ,सरपंच पदासाठी ३ अर्ज ,वालखेडा प्रभाग १ मध्ये ३ जागांसाठी १५ प्रभाग २ मध्ये ३ जागांसाठी ११ अर्ज ,प्रभाग ३ मध्ये ३ जागांसाठी १० अर्ज ,प्रभाग ४ मध्ये २ जागांसाठी १० अर्ज ,सरपंच पदासाठी १३ अर्ज ,वाघोदे प्रभाग १ मध्ये २ जागांसाठी ६ अर्ज ,प्रभाग २ मध्ये २ जागांसाठी ७ अर्ज ,प्रभाग ३ मध्ये ३ जागांसाठी ९ अर्ज सरपंच पदासाठी ४ अर्ज ,साळवे प्रभाग १ मध्ये ३ जागांसाठी ७ अर्ज ,प्रभाग २ मध्ये ३ जागांसाठी ९ अर्ज ,प्रभाग ३ मध्ये ३ जागांसाठी ७ अर्ज सरपंच पदासाठी ४ अर्ज दाखल झाले आहेत शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठी १२८ अर्ज दाखल झाले असून तर सरपंच पदासाठी २० नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत .
 
 
वरील सातही गावात दुरंगी ,तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत असून सर्वच ठिकाणी चुरशीची निवडणुका होणार असल्याचे आजतरी चित्र दिसत आहे .छाननी दिनांक चौदा मे रोजी होणार असुन सदर छाननीस तहसिल कार्यालय येथे सकाळी आकरा वाजेपासून सुरवात होणार असून छाननी होईपावेतो सदर प्रक्रिया सुरु राहील नामनिर्देशन पत्र माघार घेन्याची मुदत सोळा मे असून दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@