कर्नाटकात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
LIVE : कर्नाटक ५ वाजेपर्यंत ६४ टक्के मतदान 
 
कर्नाटक दुपारी १ वाजेपर्यंत ३६.९० टक्के मतदान  
 
 
 
कर्नाटक : कर्नाटक विधानसभा जागांसाठी आज सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. कर्नाटक विधानसभेतील एकूण २२४ जागांपैकी २२२ जागांसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. आज होणाऱ्या या मतदानाची मतमोजणी १५ मे यादिवशी होणार आहे. 
 
 
 
आज सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. आध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. माजी पंतप्रधान एच डी देवेगौड़ा, भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर, भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी.एस. येडियुरप्पा यांनी सगळ्यांनी आपापल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. 
 
 
 
सकाळपासून मतदान केंद्रावर देखील नागरिकांनी मतदान करण्यासाठी पोहोचले आहेत. वृध्द नागरिक देखील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचतांना दिसत आहेत. आता आज संध्याकाळपर्यंत किती मतदान होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@