नैराश्यातूनच रॉय यांची आत्महत्या : पोलीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2018
Total Views |

मृतदेहापाशी सापडली 'सुसाईड नोट'



मुंबई : माजी एटीएस प्रमुख व अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांनी नैराश्यातूनच आत्महत्या केली असल्याचे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रॉय यांच्या मृतदेहापासून एक पत्र मिळाले असून यामध्ये आपण नैराश्यामुळे आत्महत्या करत असल्याचे रॉय यांनी म्हटले, असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच रॉय यांच्या कुटुंबियांना येती काही दिवस एकांत देण्यात यावा, असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.

मुंबई पोलिसांनी एक सूचना पत्र जारी करून याविषयी माहिती दिली आहे. हिमांशू रॉय हे गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त होते. या आजरापणामुळेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे रॉय यांनी आपल्या पत्रामध्ये लिहिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच पत्रातील हस्ताक्षरावरून हे पत्र रॉय यांनीच लिहिले असल्याचे देखील स्पष्ट झाले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तरी सर्व प्रसार माध्यमांनी रॉय यांच्या कुटुंबियांना थोडा एकांत द्यावा, असे आवाहान देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे.


@@AUTHORINFO_V1@@