बनावट मतदान ओळखपत्र प्रकरणी कॉंग्रेसच दोषी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2018
Total Views |

मुनिरत्न नायडूला तातडीने अटक करण्याचे आदेश



बेंगळूरू :
राज राजेश्वरीनगरमध्ये आढळून आलेल्या बनावट मतदान ओळखपत्रांच्या रॅकेट मागे कॉंग्रेस पक्षाचाच हात असल्याचे सिद्ध झाले असून कॉंग्रेस आमदार मुनिरत्न नायडू याला ताबडतोब अटक करण्याचे आदेश बंगळूरू न्यायालयाने आज दिले आहेत.


बंगळूरू न्यायालयाने याविषयी लेखी सूचना जरी केली असून यामध्ये या बनावट रॅकेटमागे कॉंग्रेसचे आमदार मुनिरत्न नायडू यांचा हात असल्याचे सिद्ध झाले असल्याचे म्हटले आहे. मुनिरत्न यांनी मोहन आणि किरण या दोन व्यक्तींना पैसे देऊन बनावट जलाहल्लीमधील एसएलवी अपार्टमेंटमध्ये हे रॅकेट चालवण्याविषयी सूचना दिल्या होत्या. जेणे करून येत्या १२ तारखेच्या निवडणुकांमध्ये विजयी होता येईल. परंतु काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघड झाले असून पोलिसांनी नायडू यांच्यावर तत्काळ अजामीन पात्र गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.



दरम्यान न्यायालयाच्या या आदेशानंतर भारतीय जनता पक्षाने यावर आनंद व्यक्त करत, हा लोकशाहीचा विजय असल्याचे म्हटले आहे. तसेच भाजपवर आरोप लावल्याप्रकरणी कॉंग्रेसवर जोरदार टीका करत. निवडणुकांमध्ये विजयी होण्यासाठी असे प्रकार करण्याची सवय कॉंग्रेसला इंदिरा गांधींच्या काळापासूनच आहे, असा टोला भाजपने लगावला आहे. इंदिरा यांना देखील अशाच प्रकारे अटक झाली होती आणि त्यांना देखील जामीन घेऊन बाहेर यावे लागले होते. आता सिद्धरामय्या सरकार देखील त्याच मार्गाने जात असून फक्त सत्तेसाठी म्हणून अशा गोष्टी करत आहे, अशी टीका भाजपने केली आहे.





काय आहे हे प्रकरण ?

गेल्या आठ तारखेला राज राजेश्वरीनगर मधील एका घरामध्ये बनावट मतदान ओळखपत्र बनवण्याचे रॅकेट सुरु असल्याचे उघड झाले होते. या रॅकेटमधून एकूण ९ हजार ७४६ बोगस मतदान ओळखपत्र सापडली होती. यावर कॉंग्रेसने कांगावा करत या रॅकेट मागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला. पण भाजपने याला नकार देत उलट कॉंग्रेसच यामागे असल्याचा दावा केला होता. याप्रकरणी दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाची देखील भेट घेतली होती. यावर आयोगाने तातडीने कारवाई करत कॉंग्रेस आमदार नायडूसह एकूण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

@@AUTHORINFO_V1@@