आंबा लवकर पिकविण्यासाठी रसायनाचा वापर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2018
Total Views |

५ लाखांचे १० टन हापुस,बदाम आंबे जप्त

 
जळगाव :
जिल्ह्यात आंब्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहेे.मात्र हे आंबे कशा प्रकारे पिकविण्यात येतात. झाडांवर अद्याप कैर्‍या पुर्णत्वास येण्यास बाकी असतांना जिल्ह्यात जागोजागी आंबे विक्री होतांना दिसत आहे. या आंब्यांना पिकविण्यासाठी रसायनांचा उपयोग करून कमी वेळेत लवकर पिकविण्यात येत असल्याची माहिती अन्न व प्रशासन विभागाला मिळाली त्यावरून त्यांनी शुक्रवारीकारवाई बळीराम पेठेतील एका आंबा व्यापार्‍याच्या गोडावूनवर धाड टाकुन तपासणी केली असता.तेथे रसायनांच्या सहाय्याने आंबे पिकविण्यात येत असल्याचे दिसून आले.अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी कारवाई करून ५ लाख ६२ हजार ५०० रूपयांचे १० टन हापुस,बदाम आंबे जप्त केले.तसेच या आंबा व्यापार्‍यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
 
 
अक्ष तृतियेला घागर भरतांना आंबा वापरण्याची प्रथा आहे. त्याचा गैरफायदा फळ विक्रेते घेतात.याकालावधीत आंबे मोठ्या प्रमाणात अव्वाच्यासव्वा किमतीत विकले जातात. काही दिवसांनी खान्देशात अधिक महिना सुरू होणार आहे.त्यामुळे मुलगी माहेरी आलेली असुन आता अधिक महिन्यात जावाई घरी येणार असल्याने आंबा रस मुख्य जेवण बनते त्यामुळे खान्देशात आंब्याला मोठी मागणी असतो.हि मागणी पुर्ण करण्यासाठी आंब्याचे व्यापारी आंबे लवकर पिकविण्यासाठी आंब्यावर रसायनिक स्प्रे किवा आंब्याच्या मालात कॅल्शियम कार्बाईडच्या पुड्या टाकतात त्यामुळे आंबे लवकर पिकतात.किवा त्याच्यावर पिवळा रंग येतो.यामुळे फळ हे लवकर पिकत असले तरी ते आपल्या शरीराला अपायकारक असतो.त्यामुळे जळगावच्या अन्न व प्रशासन विभागाने मिळालेल्या माहिती नुसार बळीराम पेठेतील अकबर खान रऊफ खान (रा.नशिराबाद) यांनी भाड्याने घेतलेल्या गोडावर सकाळी ११ वाजेला तपासणी केली.त्यावेळी अकबर खान याच्या गोडावून मध्ये हापुस ,बदाम आंबे होते.त्यांना पिकविण्यासाठी केमीकल असलेले स्प्रे, व झाकुन ठेवलेल्या आंब्याच्या मालात कॅल्शियम कार्बाईडच्या पुड्या मिळाल्या.माल जप्त करण्यात आलेल्या मध्ये हापुस आंबा ७.५ टन,तर बदाम आंबा २.५ टन मिळाला आहे.बाजार मुल्या ५ लाख ६२ हजार ५०० रूपये असुन हि कारवाई अन्न व प्रशासन सहाय्यक आयुक्त एम.डी. शाह, अन्न व सुरक्षा अधिकारी अनिल गुजर, चंद्रकांत सोनवणे यांच्यासह मनपाचे विभागाचे अधिकारी व कर्मचारी होते.याकारवाईमुळे आंबे व्यापार्‍याचे दाबे दणाणले आहे.
 
 
खान्देशात आंबे मोठ्याप्रमाणात विक्रीस आलेले आहेत. पण शेजारी असलेल्या गुजरात राज्यात केैरी अजून झाडावरच आहेत. जेव्हा झाडावरच कैरीची शाख होते तेव्हाच तेथे आंबा झाडावरुन उतरविण्यात येतो. महाराष्ट् गुजरात सीमेवर अद्याप आंबा खाण्यास सुरवात झालेली नाही.मात्र खान्देशात आंब्याला प्रचंड मागणी असल्याने रसायनाचा वापर करुन व्यापारी अंाबे पिकवून विष विकत असल्याची सामान्यांची चर्चा आहे.
@@AUTHORINFO_V1@@