भंडारा जिल्हयात १४४ कलम लागू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
उमेदवारांच्या वाहनाकरीता एक खिडकी योजनेंतर्गत परवाना कक्ष
 

भंडारा : लोकसभा मतदार संघ पोट निवडणूक २०१८ करीता निवडणूकीची प्रक्रिया सुरु झालेली असून २८ मे २०१८ मतदानाचा दिनांक निश्चित करण्यात आलेला आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२६ मधील तरतूतदीनुसार मतदान बंद होण्याच्या वेळेपासून ४८ तास अगोदर संबंधित मतदार संघात प्रचाराचा कालावधी संपणार आहे मतदार संघाबाहेरुन आलेल्या आणि त्या मतदार संघाचे मतदार नसलेल्या राजकीय नेते तसेच स्टार प्रचारक इत्यादींनी त्या मतदार संघात उपस्थित राहू नये व अशा राजकीय व्यक्तींनी व स्टार प्रचारकांनी प्रचाराचा कालावधी समाप्त होताच तो मतदार संघ सोडावा, असे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. यान्वये अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी विजय भाकरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ संपूर्ण जिल्हयात लागू केले आहे.
 
 
 
भंडारा-गोंदिया मतदार संघातील मतदार नसलेले सर्व राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व व्यक्तती व प्रचाराकरीता आलेले स्टार प्रचारक हे कायद्यानुसार निधारित निवडणूक प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर लोकसभा मतदार संघात राहिल्यास त्यांचेकडून प्रचार मोहिम राबविली जाण्याचा संभव आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@