नरेंद्र मोदी यांचे नेपाळमधील जनकपुर विमानतळावर आगमन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
जनकपुर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नेपाळ दौऱ्यावर गेले आहेत. दोन दिवसांचा नरेंद्र मोदी यांचा हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात नरेंद्र मोदी प्रथम जनकपुर विमानतळावर उतरले असून या ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. भारत आणि नेपाळ यांचे धार्मिक संबंध जवळचे आहे, त्यामुळे धार्मिक सजावट करून नेपाळने नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. 
 
 
 
विमानतळावर राम सेना तयार करून नेपाळने भारत आणि नेपाळ यांच्या सामाजिक आणि धार्मिक संस्कृतीचे दर्शन यावेळी करून दिले. नरेंद्र मोदी यांनी देखील उत्साहामध्ये या राम सेनेला प्रोत्साहन देत त्यांना अभिवादन केले. या दौऱ्यात नरेंद्र मोदी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची भेट घेवून त्यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. 
 
 
 
तसेच नरेंद्र मोदी आणि के.पी. शर्मा ओली यावेळी अरुण-३ या जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. आज नरेंद्र मोदी जनकपुर येथील जानकी मंदिराला भेट देणार असून तेथे ते पूजा करणार आहेत. हा दौरा भारत आणि नेपाळचे संबंध मजबूत करण्यासाठी महत्वाचा दौरा मानला जात आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@