चिदंबरम् कुटुंबीय पुन्हा एकदा अडचणीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2018
Total Views |


चेन्नई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पी.चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम् आणि इतर कुटुंबीय पुन्हा एकदा अडचणीमध्ये आले आहेत. परदेशातील आपल्या संपत्तीविषयी माहिती उघड न केल्यामुळे आयकर विभागाने ब्लॅक मनी अॅक्टअंतर्गत चिदंबरम् यांच्या कुटुंबीयांविरोधात चेन्नई न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. तसेच न्यायालयाने देखील यावर सुनावणी करण्यास तयारी दर्शवली असून यामुळे चिदंबरम् कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चिदंबरम् यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम्, मुलगा कार्ती चिदंबरम् आणि सून श्रीनिधी चिदंबरम् या तिघांविरोधात आयकर विभागाने तक्रार दाखल केली आहे. आयकर विभागाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार चिदंबरम् कुटुंबीयांनी परदेशामध्ये केलेली गुंतवणूक आणि तेथील संपत्तीविषयी कधीही आणि कसलीही माहिती आजपर्यंत उघड केलेली नाही. परदेशी गुंतवणुकीत त्यांना सातत्यने नफा होत आहे. परंतु हा नफा त्यांनी भारत सरकार आणि आयकर विभागापासून लपवून ठेवलेला आहे. त्यामुळे ब्लॅक मनी अॅक्टनुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आयकर विभागाने चेन्नई न्यायालयाकडे केली आहे. दरम्यान न्यायालयाने देखील या तक्रारीवर सुनावणी करण्याबाबतीत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे चिदंबरम् कुटुंबियांचे नेमके पुढे काय होणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच कार्ती चिदंबरम् यांच्या मागील चौकशीचा ससेमिरा सुटलेला होता. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी, कंपन्यांच्या नावाखाली गैरव्यवहार केल्याचा आरोपाखाली गेल्या वर्षभर इडी आणि आयकर विभाग कार्ती चिदंबरम् यांची चौकशी करत होते. यासाठी म्हणून पी.चिदंबरम् यांना देखील अनेक वेळा चौकशीसाठी जावे लागले होते. यातून बाहेर पडून थोडेच दिवस होत नाहीत तोवर आता ही नवी चौकशी त्यांच्या मागे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@