भुसावळात माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांचे जल्लोषात स्वागत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2018
Total Views |

 
भुसावळ :
भोसरी प्रकरणात माजीमंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्यावर भूखंड खरेदी प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मात्र पुणे एसीबीने त्याचा अहवाल न्यायालयामध्ये सादर केला. अहवाल पाहून या खरेदीत शासनाचे कुठलेही नुकसान झाले नसल्याचे नमूद असल्याचे पाहून न्यायालयाने आ.खडसे यांना या प्रकरणी क्लीन चीट दिली. यानंतर माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचे शनिवार १२ मे रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास दादर-अमृतसर एक्सप्रेसने भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाले.
 
 
यावेळी रेल्वे स्थानकावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात ढोलताशाच्या गजरात आ.खडसेंचे स्वागत केले. भुसावळसह परिसरातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ या गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता.
 
 
स्वागत करण्यासाठी भाजपाचे आमदार संजय सावकारे, भाजपा जिल्हासंघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक प्रमोद नेमाडे, किरण कोलते, गटनेते मुन्ना इब्राहीम तेली, पाणीपुरवठा सभापती राजू नाटकर, वसंत पाटील, प्रमोद इंगळे, अमोल इंगळे, पंचायत समितीचे सभापती सुनील महाजन, नगरसेविका मेघा वाणी, नगरसेवक बापू महाजन यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
रेल्वे स्थानकावर आ. एकनाथराव खडसे, त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांचे कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देवून फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत केले. नंतर शहरातील गांधी पुतळा सरदार वल्लभभाई पटेल चौक, पांडुरंग टॉकीज या मार्गाने गाड्यांच्या ताफ्यासह रॅली काढण्यात आली. यानंतर आ. खडसे हे मुक्ताईनगरकडे रवाना झाले.
 
 
आ.एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी दोन दिवसाचा कालावधी कार्यकर्त्यांना दिला आहे. आ.नाथाभाऊंना क्लीनचीट मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.
@@AUTHORINFO_V1@@