डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्या भेटीची तारीख निश्चित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
सिंगापूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन या दोन्ही नेत्यांच्या भेटीची तारीख निश्चित झाली आहे. येत्या १२ जूनला हे दोन्ही नेते एकमेकांना सिंगापूर येथे भेटणार आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून हे दोन्ही नेते भेटणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र या भेटीची तारीख निश्चित झाली नसल्याने हे दोन्ही नेते खरंच भेटणार आहे काय यावर प्रश्नचिन्ह होते. 
 
 
 
आता मात्र या प्रश्नचिन्हाला आता विराम लागला असून हे दोन्ही नेते सिंगापूर येथे १२ जूनला भेटणार आहेत अशी माहिती पुढे आली आहे. उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात गेल्या २ वर्षांपासून सुरु असलेला तणाव आता कमी होण्याची चिन्हे या होणाऱ्या भेटीमुळे दिसू लागत आहे. दोन्ही देशांमधील तणाव नष्ट व्हावा व चर्चेतून यावर मार्ग काढावा, यासाठी उत्तर कोरियाने अमेरिकेला चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. अमेरिकेने देखील उत्तर कोरियाच्या या निमंत्रणाचा स्वीकार केला होता.
 
 
 
त्यानुसार आता हे दोन्ही नेते एकमेकांची भेट घेवून हा तणाव चर्चेच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. उत्तर कोरिया नेहमी अणु चाचणी आणि क्षेपणास्त्र चाचणी घेतो, हा या दोन्ही देशांमधील तणावाचा मुख्य मुद्दा असणार आहे. यावर दोन्ही नेते चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. 
 
 
 
गेल्या दोन वर्षांपासून अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. तसेच दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकमेकांना युद्धाच्या धमक्या दिल्या होत्या, तर अमेरिकेने कोरियन सागरामध्ये आपल्या युद्ध नौका देखील सज्ज केल्या होत्या. त्यामुळे यावर शांततेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात यावा अशी जगाची इच्छा होती. त्यामुळे आता हे दोन्ही नेते भेट घेवून यावर उपाय करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या दोन्ही देशांकडे आता लागले आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@