के.एम. जोसेफ सर्वोच्च न्यायालयाचे नवे न्यायाधीश ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2018
Total Views |




नवी दिल्ली : उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के.एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नियुक्तीला न्यायालयीन कोलीज्मने (Collegium) आज हिरवा कंदील दाखवलेला आहे. कोलीज्मच्या आज झालेल्या बैठकीमध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रासह सर्व सदस्यांनी जोसेफ यांच्या नावाला आपली सहमती दर्शवली आहे. परंतु देशातील इतर सर्व उच्च न्यायालयांच्या प्रतिनिधींचे देखील मत जाणून घेतले जाईल व त्यानंतरच यावर निर्णय घेतला जाईल, असे कोलीज्मने स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारच्या सुचनेनुसार सरन्यायाधीश मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत कोलीज्मची आज बैठक झाली. याबैठकीला कोलीज्मचे इतर सदस्य म्हणजेच जस्टीस चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरीअन जोसेफ हे सर्व जण उपस्थित होते. याबैठकीत जोसेफ यांच्या नावावर पुन्हा एकदा चर्चा झाली व जोसेफ यांनचे नाव पुन्हा एकदा सरकारकडे पाठवण्यावर एकमत झाले. परंतु या अगोदर इतर सद्स्यांशी देखील चर्चा केली जावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला. याला देखील सर्वांनी सहमती दर्शवत येत्या १६ तारखेला यासंबंधी सर्व प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतरच जोसेफ यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केला जाईल, असे कोलीज्मने स्पष्ट केले.

 
दरम्यान गेल्या जानेवारी महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या दोन पदांसाठी वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा आणि जोसेफ यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. यातील मल्होत्रा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना न्यायाधीश बनवण्यात आले. परंतु जोसेफ यांचे नाव मात्र तसेच ठेवण्यात आले. यावर काही जणांकडून आक्षेप घेण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने देखील कोलीज्मला यावर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला होता.
@@AUTHORINFO_V1@@