रामदेव बाबांनी दिला लालू यांना योगा करण्याचा सल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2018
Total Views |

 
पटना :  आज योगगुरु बाबा रामदेव यांनी पटना येथे बिहारचे माडी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लालू प्रसाद यादव यांना आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग करण्याचा सल्ला देखील दिला असल्याची माहिती समोर येत आहे. पटना येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असताना बाबा रामदेव यांनी लालू यांची भेट घेतली.
 
यावेळी त्यांनी लालू यांचे ६ आठवड्यांचा जामीन मिळाल्याबद्दल अभिनंदन देखील केले. तसेच त्यांना योग करण्याचा सल्ला देखील दिला. चारा घोटाळ्याच्या विविध प्रकरणांमध्ये अडकलेल्या लालू यांना न्यायालयाने तरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, मात्र आरोग्याविषयी असलेल्या विविध समस्यांमुळे त्यांना ६ आठवड्यांचा जामीन देण्यात आला आहे.
 
मात्र रामदेव बाबा यांनी लालू यांची भेट का घेतली याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात येत आहे, तसेच यामुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@