अॅसिड आणि अत्याचार पिडीत महिलांना आता मिळणार मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : अॅसिड आणि अत्याचार पिडीत महिलांना आता मदत रक्कम मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण अर्थात ‘NALSA’ ची योजना मान्य करत या योजनेला मंजुरी दिली आहे. आता ज्या महिलांवर अत्याचार आणि अॅसिड हल्ला करण्यात आला आहे अशा महिलांना राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाच्या योजनेंतर्गत मदत रक्कम दिली जाणार आहे. 
 
 
 
या योजनेंतर्गत पिडीत महिलांना मदत रक्कम दिली जाणार असून त्यांना सुरक्षा देखील दिली जाईल असे नमूद करण्यात आले आहे. अॅसिड हल्ला पिडीत महिलांना ७ लाख रुपये तर अत्याचार पिडीत व बलात्कार पिडीत महिलांना ५ लाख रुपये मदत रक्कम दिली जाईल असे सांगण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आदेश दिले आहेत की, येत्या एका आठवड्यात ही योजना प्रत्येक राज्याला लागू झाली पाहिजे.
 
 
 
ही योजना लवकरात लवकर लागू करा असे आदेश केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे ही योजना प्रत्येक राज्यात लागू होणार आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@