आम्ही मुद्द्यावर आधारित निवडणुका लढवितो आहे : राहुल गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
कर्नाटक : आम्ही मुद्द्यावर आधारित निवडणुका लढवितो आहे असे मत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मांडले आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कर्नाटक राज्यात राहत असलेल्या लोकांचा आवाज आहे, धर्माच्या नावावर राजकारण करण्याचा आरोप आमच्यावर लावण्यात आला मात्र जाहीरनाम्यात जे लिहिले गेले आहे तो जनतेचा आवाज आहे असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिले आहे. आज बंगळूर येथे पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. 
 
 
 
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस पक्ष धर्माच्या नावावर मत मागत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला असून आज या प्रकरणावर सुनावणी करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात धर्माच्या नावावर मत मागण्यात येत असल्याचा आरोप या याचिकेत काँग्रेस विरुद्ध करण्यात आला आहे. 
 
 
 
या मुद्द्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी आज राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला असून त्यांनी यावर त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेसने या जाहीरनाम्यात ज्या घोषणा केल्या आहेत त्यावरून असे दिसते की, काँग्रेस धर्माच्या आधारावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करीत असून हे करणे चुकीचे आहे असे या याचिकेत नमूद केले आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@