रेल्वेत चढतांना अथवा उतरतांना मृत्यू झाल्यास आता रेल्वे प्रशासन भरपाई करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : रेल्वेमध्ये चढतांना अथवा उतरतांना नागरिकांचा मृत्यू झाला तर नुकसान भरपाई रेल्वेच करणार असा महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घोषित केला आहे. रेल्वे प्रवास करीत असतांना जर प्रवाश्यांचा मृत्यू झाला तर याला रेल्वे प्रशासन जबाबदार असेल असा स्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता ज्या प्रवाश्यांचा प्रवासात मृत्यू होईल त्या प्रवाश्यांच्या आप्तेष्टांना ही रक्कम दिली जाईल. 
 
 
 
 
रेल्वे प्रवास करीत असतांना प्रवाश्यांच्या निष्काळजीपणामुळे असे अपघात होतात असे म्हणत रेल्वे प्रशासनाने ही जबाबदारी याआधी झटकली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने याला स्पष्ट करत वरील निर्णय घोषित केला आहे. मात्र घटनास्थळी जे लोक असतील त्यांच्या पुराव्याने ही रक्कम ठरेल तसेच प्रवाश्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली जाईल असेही न्यायालयाने सांगितले आहे. 
 
 
 
 
अपघात हा प्रवास करतांना होऊ शकतो किंवा रेल्वे गाडीतून उतरताना होऊ शकतो. रेल्वे स्थानक परिसरात होणाऱ्या अपघातांमध्ये रेल्वे प्रशासनालाच भरपाई द्यावी लागेल, असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र , आत्महत्या किंवा आजारपणामुळे होणारे मृत्यू किंवा स्वतःला नुकसान पोहोचवण्याच्या दृष्टीने करण्यात आलेले प्रकार याला अपवाद असतील, अशा प्रकारांमध्ये भरपाई मिळणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 
@@AUTHORINFO_V1@@