जिल्ह्यातील ३ हजार ६४० अंगणवाड्यांना तूरडाळीचा पुरवठा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018
Total Views |

फेडरेशन करणार वाटप; राज्य शासनाचा निर्णय

जळगाव :
राज्य शासनाने शेतकर्‍यांकडून खरेदी केलेली तूरडाळ अंगणवाड्यांसाठी जिल्ह्यातील बचतगटांना ५५ रुपये किलोप्रमाणे दिली जाणार आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन ही तूरडाळ बचतगटांना पुरविणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील ३ हजार ६४० अंगणवाड्यांसाठी तूरडाळ पुरविली जाणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी आर.आर. तडवी यांनी दिली.
 
 
सवलतीच्या दरात तूरडाळ मिळविण्यासाठी बचतगटांना तालुकास्तरावर बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे मागणी नोंदवावी लागेल. त्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून महिला व बालकल्याण विभागाकडे मागणीचा प्रस्ताव सादर केला जाईल. त्यानुसार जिल्ह्यातील मागणी प्रस्तावांची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला दिली जाईल. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन नंतर त्या-त्या अंगणवाड्यांना थेट तुरडाळीचा पुरवठा करेल. पुरविलेल्या मालाची बिले आणि रक्कमचे आदान-प्रदान थेट मार्केटिंग फेडरेशन आणि बचतगटांमध्ये होईल. मे महिन्याच्या अखेरीस तुरडाळीचा पुरवठा करण्यास सुरुवात होणार आहे.
 
फेडरेशनतर्फे ५५ रुपये प्रतिकिलो दराने पुरवठा
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे बचतगटांना ५५ रुपये प्रतिकिलो दराने तुरडाळीचा पुरवठा केला जाणार आहे. एका लाभार्थी मुलासाठी महिनाभरात ३९० ग्रॅम असे प्रमाण एका अंगणवाडीसाठी निश्‍चित करण्यात आले आहे. १३ दिवसांच्या कालावधीत अंगणवाड्यांमध्ये मुलांना दिला जाणारा वरण-भात आणि खिचडीत ही तुरडाळ वापरली जाईल. जिल्ह्यातील अंगणवाड्या आणि त्यातील पोषण आहार लाभार्थी मुलांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यासाठी एका महिन्याला ५० ते ६० हजार किलो तुरडाळ लागू शकते, असा अंदाज महिला व बालकल्याण विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@