राज्य सरकारकडून तीन 'क्लस्टर विद्यापीठां'चा प्रस्ताव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018
Total Views |




मुंबई : महाराष्ट्रातील शैक्षणिक गुणवत्ता अधिक वाढवण्यासाठी रुसा अर्थात राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यात तीन क्लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव राज्य सरकारतर्फे रूसाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

सरकारतर्फे प्रस्तावित करण्यात आलेल्या तीन क्लस्टर विद्यापीठांच्या प्रस्तावांमध्ये एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स, केसी कॉलेज आणि बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज (बीटीटीसी) या महाविद्यालयांचे एक क्लस्टर विद्यापीठ तर के.जे.सोमैय्या कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्स, के.जे. सोमैय्या कॉलेज ऑफ आर्टस अॅण्ड कॉमर्स, एस. के. सोमैय्या कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स या तीन महाविद्यालयांचे दुसरे क्लस्टर विद्यापीठ तसेच एल्फिस्टन कॉलेज, इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, सिडनॅहम कॉलेज ऑफ कॉमर्स, शासकीय बीएड कॉलेज या शासकीय महाविद्यालयांचे तिसरे क्लस्टर विदयापीठ असे तीन क्लस्टर विद्यापिठांचे प्रस्ताव रुसाकडे पाठवण्यात येणार आहेत, असे विनोद तावडे यांनी सांगितले. राष्ट्रीय उच्चस्तरीय शिक्षा अभियान (रुसा)च्या महाराष्ट्र राज्य रुसा कौन्सिलची बैठक आज उच्च व तंत्र शिक्षण विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याने प्रस्तावित केलेल्या या तीन क्लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर येथे कार्यरत प्राध्यापकांचे अनुदान हे सरकारमार्फतच सुरु राहणार, असे स्पष्ट करतानाच तावडे यांनी सांगितले की, या क्लस्टर विद्यापीठांमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अधिक सुधारणा होईल, तसेच विद्यार्थ्यांना 'चॉईस बेस्ड क्रेडीट सिस्टिम'चाही लाभ मिळू शकेल, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम निवडण्यासाठी अधिक उत्तम पर्याय उपलब्ध होऊ शकतील.

रुसाच्या माध्यमातून राज्यातील शासकीय महाविद्यालये आणि विद्यापीठ यांना अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने तसेच शैक्षणिक गुणवत्ता अधिक दर्जेदार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या विद्यापीठांना आवश्यक शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी रुसा प्रयत्न करत असल्याचे तावडे यांनी सांगितले. रुसाच्या आजच्या राज्य बैठकीत महाराष्ट्रातील विद्यापिठांमध्ये संशोधन, नाविन्यपूर्ण व उच्च शिक्षणासाठी प्रस्ताव देण्यात आले आहेत, तसेच नॅक मूल्यांकनासाठी रुसांतर्गत सहाय्यता कक्षाची निर्मिती करण्याचा विचारही या बैठकीत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या अधिक क्षमता विकासासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.


@@AUTHORINFO_V1@@