रमजान शस्त्रसंधी प्रस्तावावर ओमर अब्दुल्ला नाराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018
Total Views |

रमजानमध्ये भारतीय सैन्येने शस्त्रसंधी पाळण्याची होती मागणी



श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील पीडीपी आणि भाजप सरकारने रमजानमध्ये शस्त्रसंधी पाळण्याचा प्रस्ताव मान्य न केल्यामुळे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमार अब्दुल्ला हे काश्मीर सरकार आणि मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यावर चांगलेच नाराज झाले आहे. शस्त्रसंधीचा प्रस्ताव जर केंद्र सरकार आणि भाजप मान्य करत नसेल तर सर्वपक्षीय बैठकीला अर्थच काय उरला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच मुफ्ती यांचा प्रस्ताव जर त्यांचे मित्र पक्षच नाकारत असतील, तर मुफ्ती तरी सत्ते का राहत आहे ? असा प्रश्न त्यांनी निर्माण केला आहे.

श्रीनगर येथे काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जम्मू-काश्मीरमधील स्थानिक पक्ष आणि मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाने शस्त्रसंधी संबंधी एका प्रस्तावावर चर्चा केली होती. ज्यानुसार येत्या रमजान महिन्यामध्ये भारतीय सैन्येने शस्त्रसंधीचे पालन करत गोळीबार करू नये, अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्ससह सर्व स्थानिक पक्षांनी केली होती. परंतु जम्मू-काश्मीर भाजपने या प्रस्तावाला नकार देत सैन्य कसल्याही प्रकारची शस्त्रसंधी पळणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पंतप्रधान मोदींशी देखील याविषयी होणार नसल्याचे त्यांनी प्रदेश भाजपने स्पष्ट केले.

भाजपच्या या भुमिकेनंतर अब्दुल्ला यांनी भाजप आणि मुफ्ती यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुरु केला. सर्वपक्षीय बैठकीमध्ये चर्चा होऊन देखील भाजप आणि केंद्र सरकार जर प्रस्ताव मान्य करत नसतील, या बैठकीला अर्थच काय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच मुफ्ती यांच्यावर ताशेरे ओढत, मित्रपक्ष मुफ्ती यांच्या प्रस्ताव मान्य करत नसताना देखील मुफ्ती निर्लज्ज सरकारला का चिटकून आहेत ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान मुफ्ती यांनी मात्र यावर अद्याप कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


दरम्यान ओमार अब्दुल्लांच्या या मागणीवर भारतीय लष्कराने देखील आपली भूमिका स्पष्ट करत शस्त्रसंधीचे पालन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय लष्कराने जरी एकतर्फा युद्धबंदी घोषित केली, तरी समोर लष्करावर कोणी हल्ला करणार नाही, याची काय शाश्वती ? असा प्रश्न लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी उपस्थित केला आहे. तसेच भारतीय लष्कर हे आनंदाने किंवा स्वइच्छेने कोणावरही हल्ला करत नाही, तर परिस्थितीमुळे लष्कराला आवश्यक ती भूमिका घ्यावी लागते, असे त्यांनी म्हटले,
@@AUTHORINFO_V1@@