रेल्वेस्थानकावरील मोफत वायफायमुळे कूली झाला ऑफिसर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018
Total Views |

 
 
एर्नाकुलम : केरळमधील एर्नाकुलम जंक्शन या रेल्वेस्थानकावर कूलीचं काम करणाऱ्या श्रीनाथनं नव्या पिढीसाठी एक आदर्श सिद्ध केला आहे. के श्रीनाथ या कूलीनं राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच केपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्याची कमाल केली आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे त्याने ही परीक्षा रेल्वे स्थानकावर देण्यात येणाऱ्या मोफत वायफाय सेवेमुळे उत्तीर्ण केली आहे, असे त्यानी सांगितले.
केरळच्या एर्नाकुलम जंक्शनवर के श्रीनाथ हा तरुण हा हमालाचे काम करतो. मोफत वायफाय सेवेच्या माध्यमातून त्याने विविध प्रश्न पत्रिका सोडवल्या तसेच तयारीच्या दृष्टीने आवश्यक असे अनेक व्हिडियोज बघितले आणि यामुळे त्याने कुठल्याही शिकवणी किंवा क्लास शिवाय ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
गूगल आणि वायफायमुळे माझे आयुष्य बदलले अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत. आजच्या काळात इंटरनेटमुळे जग खूप बदलले आहे. आणि या इंटरनेटचा वापर अनेक लोक विविध चुकीच्या गोष्टींसाठी किंवा वेळ वाया घालवण्यासाठी देखील करतात, मात्र श्रीनाथने इंटरनेटचा वापर करुन फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करता येतो याची शिकवण आजच्या पिढीला दिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@