अखेरकार भुजबळ परतले घरी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018
Total Views |

लवकरच कार्यकर्त्यांसमोर येणार असल्याची घोषणा




मुंबई :
'महाराष्ट्र सदन' गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगवास भोगलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे अखेरकार आपले मुळ घरी परत आले आहेत. केईएम रुग्णालयातून सोडल्यानंतर तब्बल सव्वा दोन वर्षांनंतर भुजबळ हे आपल्या घरी परतले असून लवकरच आपण पुन्हा एकदा आपल्या कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि भुजबळ समर्थकांमध्ये सध्या जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या आठवड्यात न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर भुजबळ यांना काही दिवस मुंबईमधील केईएम रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर आज डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवागनी दिल्यानंतर ते आपल्या घरी परतले. दरम्यान रुग्णालयाबाहेर पडल्याबरोबरच रूग्णालयाबाहेर जमलेल्या पत्रकारांनी भुजबळ यांना गराडा घातला व यानंतर काही काळ भुजबळ यांनी पत्रकारांशी चर्चा केली.

तब्बल सव्वा दोन वर्षांनंतर जामीन मिळाल्यानंतर सध्या 'झाले मोकळे आकाश' अशी भावना आपल्या हृदयात दाटत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी इतके दिवस शिक्षा भोगली, पण अजून हा गुन्हा सिद्ध झालेला नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच लवकरच याविषयचे सत्य जगासमोर येईल आणि आपण यातून निर्दोष मुक्त होऊ, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.


जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन पवारांचा

न्यायालयाकडून आपला जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर आपलेला तुरुंगाबाहेर सोडण्यात आले. यानंतर लगेच शरद पवार यांनी आपल्याला फोन केला व तब्येतीची काळजी घेण्याची सूचना दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

पडत्या काळात दिली सेनेनी साथ

आपण तुरुंगात असताना शिवसेनेनी आपल्या मुखपत्रामधून तसेच भाषणांमधून अनेक वेळा आपली बाजू घेतली. भुजबळ हे निर्दोष असल्याचे शिवसेनेनी म्हटले होते. पडत्या काळात सेनेनी आपल्याला साथ दिली तसेच चांगले शब्द बोलले. यामुळे सेनेबरोबर असलेला २५ वर्षांचा ऋणानुबंध पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे भुजबळ यांनी म्हटले.
@@AUTHORINFO_V1@@