जिल्ह्यातील ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018
Total Views |

लाभार्थ्यांच्या मुलींच्या नावावर बँकेत ‘एफडी’

जळगाव :
पहिल्या मुलीच्या जन्मानंतर मातेने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास ५० हजार रुपये आणि दुसरी मुलगी झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास २५-२५ हजार असे ५० हजार रुपयांची फिक्स डिपॉझिटची ‘एफडी’ महाराष्ट्र बँकेत ठेव ठेवण्याची योजना राज्यात आधीच्या आघाडी सरकारची ही ‘सुकन्या’ योजना होती. नंतर राज्यात भाजप सरकार आल्यानंतर या योजनेचे नाव बदलवून ‘माझी कन्या भाग्यश्री’ असे ठेवण्यात आले होते. परंतु आघाडीचे एक आणि नंतर भाजप सरकारचे चार वर्षे असे पाच वर्षात या योजनेंतर्गत राज्यात एकाही लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळाला नव्हता. मात्र, आता या योजनेंतर्गत राज्यासह जळगाव जिल्ह्यातील १०४ लाभार्थी मातेच्या मुलींना लाभ मिळणार आहे. योजनेत लाभार्थ्यांच्या मुलीच्या नावावर महाराष्ट्र बँकेत फिक्स डिपॉझिट ‘एफडी’ ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे महिला बाल विकास अधिकारी आर.आर.तडवी यांनी दिली.
 
 
भाजप सरकारच्या काळातील दुसर्‍यांदा ‘सुधारित माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी १ ऑगस्ट २०१७ पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ७.५० लाख रुपये असून राज्याचा रहिवासी तसेच जन्मनोंदणी प्रमाणपत्र आणि एका मुलीच्या जन्मानंतर माता/पित्याने एक वर्षाच्या आत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली पाहिजे. त्यानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्यांच्या मुलीच्या नावावर ५० हजार रुपयाची फिक्स डिपॉझिट ठेवण्यात येते. दोन मुलीनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया सहा महिन्याच्या आत केल्यास दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार याप्रमाणे लाभ देण्यात येत असल्याचा शासनाचा आदेश आहे.
 
तालुकानिहाय १०४ लाभार्थी
जिल्ह्यातील अमळनेर ४, भडगाव ६, भुसावळ ३, बोदवड २, चोपडा ग्रामीण ७, चोपडा शहरी ७, चाळीसगाव २, धरणगाव १, जळगाव १, जामनेर शहरी ३, जामनेर ग्रामीण ४, मुक्ताईनगर ६, पाचोरा ३, पारोळा ३, रावेर शहरी ५, रावेर ग्रामीण ४, यावल ६, जळगाव शहरी ३२, भुसावळ शहरी ५ असे १०४ लाभार्थी पात्र ठरले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@