ऐन उन्हाळ्याच्या सुटीत रेल्वेपेक्षा विमानसेवा परवडणारी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018
Total Views |

प्रचंड रकमांच्या अघोषित व्यवहारांवर आयकर विभागाची कारवाई
महानगरांचा प्रवास बोटावर मोजण्याइतक्या तासातच..


 
कंटाळवाणा प्रवास टाळता येणार
रेल्वेपेक्षा तुलनेने कमी भाडे, वेळेतही बचत
सध्या उन्हाळी सुट्यांचा मौसम असून अनेक जण दूरवरच्या प्रवासाचे बेत आखीत आहेत. पण रेल्वे व लक्झरी बससेवांचे वाढते भाडे त्यांना मोडता घालीत आहे. अशातच रेल्वेपेक्षा विमानाने प्रवास करणे परवडणारे असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबरोबरच मुंबई, दिल्ली, बंगलोर, चेन्नई यासारख्या महानगरांपर्यंत जाण्यासाठीचा दिवसभराचा प्रवासही टळणार असून तेथे काही तासातच जाता येणे शक्य होणार आहे. म्हणजेच प्रवास स्वस्त व जलदही होणार
 
मुंबई ते दिल्लीपर्यंत राजधानी एक्सप्रेसचे द्वितीय श्रेणीचे वातानुकूल श्रेणीचे तिकिट मिळण्यासाठी चार हजार रुपये मोजावे लागणार आहे. तर विमानाच्या उड्डाणाचे तिकिट साडे तीन हजारात मिळणार आहे. याच प्रमाणे दिल्ली ते कोलकातासुटपर्यंतचे राजधानी एक्सप्रेसचे तिकिट ४३४५ रुपयांना पडणार आहे. तर विमानाचे तिकिट ३५०० ते ४ हजारांपर्यंत मिळणार आहे. दिल्ली ते पाटणापर्यंतचे राजधानीचे तिकिट ३५०० रुपये तर विमानप्रवासाचे तिकिट ३१०० रुपये राहणार आहे. दिल्ली ते रांचीपर्यंतच्या सेकंड एसीच्या ३७२५ रुपयांच्या तुलनेत विमानाचे तिकिट तीन हजारात मिळेल.
 
 
ट्रॅव्हल एजंटांच्या म्हणण्यानुसार वाढत्या स्पर्धेपोटी एअरलाईन्स कंपन्यांकडून विमान प्रवासाची तिकिटे रेल्वेच्या तुलनेत प्रवाशांना स्वस्तात दिली जात आहेत. सुट्यांमध्ये दक्षिण भारताची सहल करायची असेल तर विमानाने जाण्यात आपला बराच वेळ व पैसाही वाचणार आहे. उदाहरणादाखल दिल्लीहून चेन्नईला जायचे असेल तर विमान प्रवासाचे तिकिट ३७०० ते ५ हजार रुपये लागेल व आपण तीनच तासात इष्ट स्थळी (डेस्टिनेशन) पोहोचणार आहात. याशिवाय मुंबई ते हैद्राबादपर्यंत विमानाने व सेकंड एसी रेल्वेने जायचे असेल तर प्रत्येकी सुमारे दीड हजार रुपयेच लागतील. पण विमानाने अवघ्या दीड तासातच हैद्राबादला जाता येणार आहे. याचप्रमाणे दिल्ली ते बेंगळुरुपर्यंत विमानप्रवासाचे तिकिट चार हजार रुपयात मिळणार असून तेथे पावणेतीन तासातच पोहोचता येणार आहे.
 
 
म्हणून या सुट्ट्यांमध्ये रेल्वेऐवजी विमानप्रवासाची तिकिटे बुक करणे रेल्वेच्या तुलनेत निश्‍चितच परवडणारे आहे. ही तिकिटे ऐनवेळीही मिळू शकतात. तसेच इष्ट स्थळी अगदी बोटावर मोजण्याइतक्याच तासात पोहोचता येते. रेल्वेच्या बाबतीत अनेक महिन्यांपासून ही तिकिटे आरक्षित करावी लागतात. तसेच प्रवासालाही बराच काळ (अगदी दिवसभराचाही) लागत असतो.
रोख रक्कमेत मोठ्या प्रमाणावर खरेदी करणार्‍यांपासून सावध राहण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. आयकर विभाग ज्यांचे रोख व्यवहार व त्यांचे उत्पन्न याचा मेळ बसत नाही अशा लोकांविरोधात कडक कारवाई करीत आहे. तसेच नोटबंदीदरम्यान ज्यांनी मोठ्या प्रमाणावर रोखीने मोठी खरेदी केली अशांवरही आयकर विभाग नजर ठेवून आहे. उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमविण्या विरोधातील कायद्यांतर्गत ही कारवाई केली जात आहे. ज्यांनी आपल्या घोषित उत्पन्नाच्या तुलनेत कितीतरी पटींनी रोख रकमेचे व्यवहार केले ते आयकर विभागाच्या राडारवर आले आहेत. यादृष्टिने विभागाने देशभरात ८०० ठिकाणी सर्वेक्षणे केली आहेत. त्यात महागड्या मोटार गाड्यांचे डिलर्स व बडे ज्वेलर्स यांचा समावेश होता. याबरोबरच सहकारी बँका व बिगर बॅकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) यांचेही सर्वेक्षण करण्यात आले होते.
 
 
विशेष म्हणजे ठराविक रकमेपेक्षा जास्त पैशांच्या व्यवहारांचा अहवाल उपरोक्त वित्तीय संस्थांनी आयकर विभागा कडे पाठवायचा असतो. पण अशा अनेक वित्तसंस्थांनी मोठ्या रकमांच्या व्यवहारांची माहिती आयकर विभागाकडे पाठविली नाही. अशा वित्तसंस्थांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
 
 
या सर्वेक्षणात असे तीन लाख अघोषित व्यवहार आढळून आले आहेत. गेल्या वर्षापेक्षा यंदा तीन पट जास्त अघोषित व्यवहार झाले आहेत. या अघोषित व्यवहारांची रक्कमही गेल्या वर्षाच्या तुलनेत पाच पटीने जास्त असून ती तीन लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. हे अघोषित व्यवहार करणारे काळा पैसा बाळगणारे असावेत असा आयकर विभागाला संशय असून ते या प्रकरणी सखोल चौकशी करीत आहे.
 
शेअर बाजारात वाढ, दोन्ही निर्देशांक वधारले, रुपयाची घसरण सुरुच
काल मंगळवारच्या थंड कारभारानंतर बुधवारी ९ रोजी शेअर बाजारात चांगली वाढ झाली. बाजाराचे दोन्ही महत्वाचे निर्देशांक वधारले. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स १०३ बिंदूंनी वाढून दिवसअखेरीस ३५ हजार ३१६ बिंदूंवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २३. बिंदूंनी कमी होऊन १० हजार ७४१ बिदूंवर बंद झाला. सोन्याच्या किंमतीत ५९ रुपयांची वाढ होऊन ते ३१ हजार २६९ रुपये प्रति १० ग्रॅम वर आले होते. तर रुपयाची घसरण आजही सुरु राहत प्रति डॉलरमागे तो ६७ रुपये व २६ पैशांवर आला होता. इराणच्या अणुकार्यक्रमामुळे त्याच्यावर अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादण्याची घोषणा केल्यानंतर कच्च्या खनिज तेलाच्या किंमतीतही प्रति पिंपामागे १३८ रुपयांची वाढ होऊन ते ४७६१ रुपयांंवर आले होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@