माझ्या आईने संपूर्ण आयुष्य देशासाठी घालवले : राहुल गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2018
Total Views |





बेंगळूरू : 'माझी आई ही जन्माने जरी इटलीची नागरिक असली तरी देखील ती पूर्णपणे भारतीय असून तिने आपले संपूर्ण आयुष्य या देशासाठी घालवले आहे.' अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे. कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेंगळूरु येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आज ते बोलत होते.

'माझ्याने आपल्या आयुष्याचा बराच काळ हा भारतामध्ये घालवलेला आहे. त्यामुळे ती एक भारतीय नागरिक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून जगत आली आहे. मला आजपर्यंत भेटलेल्या अनेक 'भारतीय' लोकांपेक्षा देखील अधिक भारतीयपणा तिच्यामध्ये आहे. तिने या देशासाठी खूप मोठा त्याग केला आहे. तसेच आपले संपूर्ण आयुष्य या देशाला दिलेले आहे. त्यामुळे विरोधकांकडून तिच्या नागरिकत्वाविषयी जे वक्तव्य केले जात आहे, त्यावरूनच त्या लोकांच्या बुद्धीची कुवत समजून येते, अशी टीका राहुल यांनी यावेळी केली.



दरम्यान आपल्या या वक्तव्यामध्ये त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जोरदार टीका केली, तसेच विविध विषयांवर भाष्य केले. गांधी यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे :

बलात्कार हा राजकीय मुद्दा

कठुआ येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेवर भाष्य करताना राहुल यांनी बलात्कार हा राजकीय मुद्दा असल्याचे म्हटले. यावर बोलताना ते म्हणाले कि, देशातील महिला आणि बालिकांवर वारंवारपणे अत्याचार होत आहेत, परंतु सत्ताधारी म्हणतात कि बलात्कार हा राजकीय मुद्दा नाही. सत्ताधाऱ्यांच्या राज्यामध्येच जर महिला असुरक्षित असतील तर विरोधकांकडूनच हा मुद्दा उचलला जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे बलात्कार हा पूर्णपणे राजकीय मुद्दा असून यामुळेच पिडीतेला न्याय मिळू शकतो.'
 


दलितांचा मुद्दा उचलणे हे आमचे कामच
दलितांचे प्रश्न आणि त्या संबंधित मुद्दे उचलणे हे कॉंग्रेस पक्षाचे कामच आहे, अशी प्रतिक्रिया राहुल यांनी दलित प्रश्नांवर दिली. भारतामध्ये रोहित वेमुल्ला सारख्या एका दलित विद्यार्थाची हत्या केली जाते. उनामध्ये दलितांना सर्वांसमोर मारले जाते, अशावेळी सरकार आणि भाजप गप्प का बसते ? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रश्न समाजासमोर मांडणे हे देखील विरोधक म्हणून कॉंग्रेसचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.





 
भाजपला हिंदूं या शब्दाचाच अर्थ माहिती नाही

याच बरोबर आपल्या मंदीर भेटींवर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला देखील राहुल यांनी यावेळी उत्तर दिले. आपल्या पक्षामध्ये सर्व धर्माचे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्या आग्रहाखातर मी सर्व धार्मिक स्थळांना भेटी देतो. ज्यामुळे देश कोणत्याही एका समाजामध्ये अथवा धर्मामध्ये विभागला जाऊ नये. परंतु भाजपला मात्र 'हिंदू' हा शब्द फक्त निवडणुकांपूरताच आठवतो, त्यामुळे माझ्या मंदिर भेटीचा त्यांना त्रास होत आहे. परंतु कॉंग्रेस हा सर्व समाजाला कोणत्याही तत्वांवर विभागू पहात नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच भाजपला 'हिंदू' शब्दाचाच मुळात अर्थ माहित नाही, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

 


 
राहुल गांधी यांची संपूर्ण पत्रकार परिषद :


@@AUTHORINFO_V1@@