माध्यम क्षेत्रातील घुसळण समजून घ्यावी - किरण शेलार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2018
Total Views |


 

 
बदलापूर: मुक्त माध्यमांच्या प्रवेशानंतर माध्यम विश्वात मोठ्या प्रमाणावर घुसळण सुरू आहे व ती समजून घेतली पाहीजे असे उद्गार मुंबई तरूण भारतचे संपादक किरण शेलार यांनी काढले. मुंबई विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित नारद जयंतीच्या कार्यक्रमात बदलापूर येथे ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अष्टगं अध्यात्मिक संस्थेचे प्रमुख प्रमोद जोशी होते. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, केंद्राचे कार्यवाह मोहन ढवळीकर, समन्वयक उल्हास चांदेरकर असे मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात किरण शेलार यांनी भारतातील माध्यम प्रवासाचा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा आढावा घेतला. स्वातंत्र्य, आणिबाणी, रामजन्मभूमी आंदोलन आणि सोशल मिडीयाचा वाढता प्रभाव यावरही त्यांनी भाष्य केले. सोशल मिडीयावर आपण कसे अभिव्यक्त व्हावे हेदेखील उपस्थितांना सांगितले. यावेळी विश्व संवाद केंद्रातर्फे प्रकाशित केला जाणारा पत्रसामर्थ्य हा विशेषांकही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. सुधीर जोगळेकर यांनी विश्व संवाद केंद्राचा प्रवास व निरनिराळे उपक्रम विशद केले. मोहन ढवळीकर यांनी पत्रसामर्थ्य अंकाच्या निर्मितीची प्रवास उलगडला. माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या घनश्री चांदेरकर, पत्रलेखक अनिल पालये, केतकी चांदेरकर यांचे सत्कार करण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@