स्वित्झर्लंडमध्ये धावणार 'रणवीर सिंग एक्सप्रेस'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2018
Total Views |


बेर्न : 'पद्मावत' चित्रपटातील आपल्या जबरदस्त अभिनयामुळे सध्या देशातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला बॉलीवूडचा अभिनेता रणवीर सिंग याच्या नावाची चर्चा आता जगभरात सुरु झाली आहे. याला कारण देखील तसेच असून स्वित्झर्लंडच्या पर्यटन विभागाने चक्क रणवीरच्या नावाने रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वित्झर्लंडच्या पर्यटन विभागाने याविषयी नुकतीच घोषणा केली असून येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ही रेल्वे सुरु करण्यात येणार असल्याचे पर्यटन विभागाचे प्रवक्ते मार्कुस बेर्गर यांनी याविषयी माहिती दिली आहे.
मुळात भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी म्हणून स्वित्झर्लंडकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. स्वित्झर्लंड पर्यटन विभागाने रणवीरला आपला राजदूत (अॅम्बेसिडर) म्हणून निवडले आहे. सध्या त्याच्या माध्यमातून पर्यटन विभाग स्वित्झर्लंडच्या पर्यटनस्थळांची जाहीर करत आहेत. यातच उन्हाळ्याच्या मौसमामध्ये भारतीय पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी म्हणून लेक जिनेव्हा भागामधून जाणाऱ्या एका रेल्वेला रणवीरचे नाव देण्यात येणार आहे. जेणे करून याठिकाणी येणारे भारतीय पर्यटक या रेल्वेकडे आकर्षित होतील, असे बेर्गर यांनी सांगितले आहे.
दरम्यान परदेशामध्ये एका भारतीय अभिनेत्याच्या नावावर रेल्वे सुरु करण्याचा बहुदा हा जगातील पहिलाच प्रयत्न असावा, त्यामुळे कंपनीच्या या निर्णयाच आणि रणवीरचे सगळीकडेच कौतुक होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@