सोनिया गांधी यांना केवळ राहुल गांधींच्या रोजगाराची काळजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2018
Total Views |



बेळगवातील सभेत नितीन गडकरी बरसले


बेळगाव (जयदीप दाभोळकर) :
भारतीय जनता पक्षाच्या सरकाला शेतकऱ्यांच्या मुलांना कशाप्रकारे रोजगार मिळेल याची काळजी आहे. मात्र, सोनिया गांधी यांना केवळ राहुल गाधी यांना रोजगार कसा मिळेल याची चिंता असल्याचे सांगत दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसचा खरपुस समाचार घेतला. खानापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.


कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रचार सभांना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विठ्ठल हेलगेकर यांच्या प्रचारासाठी गडकरी बेळगावात (खानापुर) उपस्थित होते. आम्हाला विकासाचे राजकारण आणि घराणेशाहीचा अंत करायचा आहे. मात्र, काँग्रेसला विकास नको असून केवळ घराण्याचेच नियम हवे असल्याचे गडकरी म्हणाले. सिद्धरामैया सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा पार केल्या असून काँग्रेस सरकारला कर्नाटकातून हद्दपार करायचे असल्याचे ते म्हणाले. तसेच भाजप सरकार सत्तेत आल्यास भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सध्याच्या सरकारमधील अर्ध्यापेक्षा अधिक मंत्र्यांना तुरूंगवारी घडवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


काँग्रेसने गेल्या ६० वर्षांच्या कार्यकाळात देशाचे नुकसान केले असून त्यांच्या नेत्यांनी गरीब, दलित, मागासवर्गीय, सामान्य नागरिकांची आणि शेतक-यांची लूट केल्याचे गडकरी म्हणाले. काँग्रेसने समाजाला जाती धर्मावरदेखील विभागण्याचे राजकारण केले असल्याचे सांगत भाजप सरकार सत्तेत आल्यास कर्नाटकाचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासनदेखील त्यांनी यावेळी दिले.


गरीबांना घरे देणार

कर्नाटकात सत्तेत आल्यास गरीबांना घरे, २४ तास वीज आणि शेतीला २४ तास पाणी देण्याचे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले. दरम्यान, पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीबांना गॅस जोडण्या दिल्या असून आम्ही शेतकेयांच्या मुलांनादेखील रोजगार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 



शेतीला सिंचन सुविधा उपलब्ध करून देणार

खानापुरमध्ये धरण आणि शेतीला सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले. तसेच बेळगाव पणजी चार पदरी महामार्गाची निर्मिती करण्यात येणार असून तो महामार्ग खानापूरमधून जाणार आहे. तसेच यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचे ते म्हणाले.


@@AUTHORINFO_V1@@