जिल्ह्यातील वाळू वाहतूकदार संघटनाच म्हणतेय रात्रीची अवैध वाहतूक रोखा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |
जिल्ह्यातील वाळू वाहतूकदार संघटनाच म्हणतेय
 
रात्रीची अवैध वाहतूक रोखा !
 
 
जळागाव, ८ एप्रिल
अनेक वाळू वाहतूकदार २ ब्रास वाळू वाहतुकीची परवानगी असताना बिनधास्तपणे ३ ब्रास वाळू वाहतूक करीत आहे. दररोज पहाटेच्या सुमारास सुरू असलेल्या या प्रकारामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत असून, अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर कारवाईची मागणी जिल्हा वाळू वाहतूक संघटनेने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे केली आहे.
 
 
जळगाव जिल्हा वाळू वाहतूक संघटनेशी संलंग्नित असलेले सर्व वाळू वाहतूकदार शासनाच्या सर्व परवानगी घेऊन वाहतूक करतात. डम्परमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या २ ब्रास वाळू वाहतुकीच्या नियमाचे पालन करून वाळू वाहतूक केली जाते. त्यासाठी वाहतूक परवाना आणि ठेकेदाराकडून पावती घेण्यात येते. जवळपास ९० टक्के वाळू वाहतूकदार संघटनेशी संलंग्नित असून, इतर वाळू वाहतूकदार नियमबाह्य ३ ब्रास वाळू वाहतूक करतात. अशांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
 
 
संघटनेचे अध्यक्ष संजय ढेकळे, उपाध्यक्ष दगडू पंडित सपकाळे, सचिव विठ्ठल भागवत पाटील, खजिनदार रवी सपकाळे, सदस्य नाजीम खान, अमित बच्छाव, बुधा नन्नवरे, उमा चौधरी, धीरज पाटील, दीपक चौधरी, नाना चौधरी, फिरोज हाजी, लक्ष्मण पाटील, सुखदेव सपकाळे, सुनील नन्नवरे, भिका नन्नवरे आदी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@