पख्तून नागरिकांचा पाक सरकार विरोधात महामोर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |

एक लाखाहून अधिक मोर्चेकऱ्यांचा समावेश




पेशावर : पाकिस्तानच्या खैबर-पख्तून प्रांतामध्ये पाकिस्तानकडून होत असलेल्या मानवाधिकारांच्या हननाविरोधात लाखो पख्तून नागरिक काल पेशावरमध्ये रस्त्यावर उतरले होते. तब्बल १ लाख नागरिकांचा समुदाय रस्त्यावर उतरून पाकिस्तान सरकारविरोधात घोषणबाजी करत आपल्यावर होत असलेल्या अत्याचार पाकिस्तान तातडीने थांबवावे, अन्यथा पख्तून प्रांताला स्वातंत्र्य द्यावे, अशी मागणी या जमावाकडून करण्यात येत होती.

पख्तून तहफुज मुव्हमेंट (पीटीएम) या संघटनेच्या नेतृत्वाखाली या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. खैबर-पख्तून आणि आसपासच्या प्रदेशातून मोठ्या प्रमाणात पख्तून नागरिक आणि आदिवासी समाजातील नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. हातामध्ये फलक घेऊन 'पख्तूनीस्तान'च्या स्वातंत्र्याची मागणी करत हा मोर्चा पेशावरमधील पिश्त्खारा चौक येथील मैदानावर आला होता.



यानंतर पीटीएम संघटनेचे प्रमुख मंजूर पेश्तीन यांचे याठिकाणी काही काळ भाषण झाले. आपल्या भाषणामध्ये पेश्तीन यांनी 'पख्तूनीस्थान'च्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत, पाकिस्तानकडून सुरु असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. आपण सर्व जण आपल्या देशाचे (पख्तूनीस्तान) प्रतिनिधी असून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आपण आज आवाज उठवत आहेत. पाकिस्तानने गेल्या अनेक वर्षांपासून पख्तून नागरिकांवर सातत्यने अत्याचार केले आहेत. त्यामुळे आता स्वतंत्र होण्याची वेळ आली असून पख्तूनीस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आता सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे मत पेश्तीन यांनी यावेळी व्यक्त केले.

@@AUTHORINFO_V1@@