मएसो विद्यालयात नव्या संगणक प्रयोगशाळेचे उद्धाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |

 
 
 
पुणे : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील (पेरुगेट भावेस्कूल) नूतनीकृत संगणक प्रयोगशाळेचे ‘कै. प्रभाकर चानसरकर संगणक प्रयोगशाळा’ असे नामकरण आणि उद्धाटन आज श्रीमती शिल्पा प्रभाकर चानसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या माहिती तंत्रज्ञान व तंत्रशिक्षण समितीच्या अध्यक्ष आणि संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्य आनंदी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योजक संग्राम खामकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, शाळेचे महामात्र व संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य प्रा. सुधीर गाडे, शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, तसेच खामकर कुटुंबीय आणि आप्तेष्ट यावेळी उपस्थित होते. 
 
 
श्रीमती शिल्पा चानसरकर यांच्या वतीने त्यांच्या भगिनी अपर्णा विनायक आंबेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. “कै. प्रभाकर चानसरकर यांचे व्यक्तिमत्व अतिशय चैतन्यमयी आणि प्रेरणादायी होते. त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीचा आलेख कायमच चढता होता. ते सर्वांना कायमच गरजेप्रमाणे मदत करत असत आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देत. जगाच्या पाठीवर कुठेही उपचार होणार नाहीत असा डोळ्यांचा विकार झाल्यावरदेखील ते खचले नाहीत, त्यांनी अतिशय खंबीरपणे आपल्या शारीरिक व्याधींना तोंड दिले. कै. प्रभाकर चानसरकर यांचे संगणक या विषयात प्रावीण्य होते. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ शाळेतील संगणक प्रयोगशाळेसाठी देणगी दिली आहे.” असे चानसरकर यावेळी म्हणाल्या.
 
 
कार्यक्रमाच्या सुरवातीला आपल्या प्रास्ताविकात प्रा. गाडे यांनी, शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून मिळत असलेल्या देणग्यांचा आढावा घेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समाजातील दानशूर व्यक्तींच्या पाठबळामुळेच आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत संस्था मराठी माध्यमाच्या शाळा चालवू शकत असल्याचे सांगितले. यावेळी प्रा. गाडे यांच्या हस्ते श्रीमती शिल्पा चानसरकर, खामकर आणि आनंदी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील पर्यावेक्षिका भारती तांबे यांच्या हस्ते चानसरकर कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. 
@@AUTHORINFO_V1@@