मराठा समाजातील १७ जोडप्यांचा १ रुपयात सामूहिक विवाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 

मराठा समाजातील १७ जोडप्यांचा १ रुपयात सामूहिक विवाह
 
जळगाव, ८ एप्रिल
मराठा उद्योजक मंडळ, जळगाव आणि अखिल भारतीय मराठा महामंडळातर्फे रविवारी मराठा समाजातील १७ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा केवळ १ रुपयात पार पडला.
अध्यक्षस्थानी शिक्रापूर पुणे येथील कैलासराव मराठे आणि प्रमुख पाहुणे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आ. सुरेश भोळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई पाटील, उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे होते.
मराठा समाजातील शेतकरी, दुष्काळग्रस्त व शेतमजुरांच्या उपवर मुलामुलींचा विवाह केवळ १ रुपयात लावण्यात आला. समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांना संसार उपयोगी वस्तू भेट दिल्या.
यावेळी समाजातील आदर्श १५ मातांचा सत्कार जिल्हाधिकारी व महापालिका स्थायी समिती सभापती ज्योतीताई इंगळे यांच्याहस्ते करण्यात आला. यात प्रामुख्याने चमेलीबाई त्र्यंबकराव मराठे, मंगला अर्जुनराव जगताप यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला.
उल्लेखनीय समाजकार्य करणार्‍या समाजबांधवांचा ‘समाज भूषण’ तसेच उत्कृष्ट कार्य करणार्‍या ३ मंडळांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांना सन्मानित करण्यात आले. निवृत्त जिल्हा विकास प्रबंधक (नाबार्ड) जी. एम. सोमवंशी यांच्या कार्याचा जिल्हाधिकार्‍यांकडून विशेष गौरव करण्यात आला.
मंडळाचे अध्यक्ष आनंदराव मराठे, उपाध्यक्ष नानासाहेब मराठे, सचिव बालदे, दगडू मोपारी, संभाजी चव्हाण, निंबाजी गुंजाळ, डॉ. सुनिता बेंद्रे, समन्वयक जिजाबराव पवार, अर्जुनराव जगातप, रेड स्वस्तिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. धनंजय बेंद्रे, शिवाजी बिग्रेडचे अशोकराव शिंदे, उद्योजक गायके, डॉ. पी. डी. जगताप, मनोज पवार, भटू वाघारे, सुधाकर बेंद्रे, शिवाजीराव मराठे, अतुल सोनवणे, डी. एस. मराठे, प्रशांत गायकवाड, अंबरनाथ येथील मराठा महामंडळाचे अध्यक्ष अशोकराव गुंजाळ, विक्रीकर उपायुक्त राजेश जाधव, शंकरराव जाधव, एस.एस.चव्हाण, हिरामण मते, रामदास खरपास, बुर्‍हाणपूर येथील जि.प.अध्यक्षा कल्पनाताई गुंजाळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची भोजन व्यवस्था शिक्रापुर येथील कैलास मराठे यांनी पार पाडली. सूत्रसंचालन विठ्ठल मराठे व उपप्राचार्य साहेबराव थोरात यांनी केले. आभार पूजा थोरात यांनी मानले.
 
@@AUTHORINFO_V1@@