अग्रवाल समाजाच्या अधिवेशनात सुधारणांचे ठराव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
अग्रवाल समाजाच्या अधिवेशनात सुधारणांचे ठराव
जळगाव, ८ एप्रिल
जळगाव जिल्हा अग्रवाल संघटनेतर्फे जिल्हास्तरीय अग्रवाल अधिवेशन ‘अग्र-मिलन २०१८’ जळगाव येथील श्रीकृष्ण लॉन येथे पार पडले. मान्यवरांच्या हस्ते बायोडाटा संमेलन, नेत्रदान, देहदान व रक्तगट तपासणीचे उद्घाटन करण्यात आले.
मंचावर राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार डॉ. सुशील गुप्ता, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप मित्तल, विजय चौधरी, महाराष्ट्र राज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा मालती गुप्ता,
खा. रक्षाताई खडसे, आ. गोपीकिसन बाजोरिया, आ. सुरेश भोळे, महाराष्ट्राचे महामंत्री गोपाल अग्रवाल, अग्रसेवा दलाचे अध्यक्ष किरण अग्रवाल, रावेर उपनगराध्यक्षा संगीता अग्रवाल, जळगाव जिल्हा अग्रवाल संघटनेचे अध्यक्ष पवन मित्तल, महामंत्री डॉ. सुरेश अग्रवाल, आयोजन समिती अध्यक्ष मनीष अग्रवाल, स्वागताध्यक्ष विनोद अग्रवाल, कार्याध्यक्ष मुरारीलाल टिबडेवाल, महिला जिल्हा संघटनेच्या अध्यक्षा नयना अग्रवाल, महिला मंडळ अध्यक्षा दीपा टिबडेवाल, कमलकिशोर गोयनका, मिठूलाल अग्रवाल, अनिल अग्रवाल, घनश्याम अग्रवाल, गोपाल अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल, जगदिश पटवारी आदी उपस्थित होते.
 
मृत्यूभोज, महिलांचे नाच बंद
मृत्यूभोज सामाजिक स्तरावर बंद करण्यात यावे, महिलांनी लग्नात बॅण्डच्या तालावर रस्त्यावर नाचू नये, प्री-वेडिंग व्हिडिओग्राफी व त्याचे सामाजिक स्तरावर प्रदर्शन बंद करण्यात यावे आदी ठराव करण्यात आले. ‘अग्रनिर्देशिका २०१८’चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्याचे विनामूल्य वितरण केले जाणार आहे. सूत्रसंचालन रूपा अग्रवाल, अंशु अग्रवाल, दीप्ती अग्रवाल यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पूनम पटवारी व रेणु अग्रवाल यांनी करून दिला.
महिलांसाठी स्पर्धा
मंडळातर्फे नारी शक्तीवर नाटिका सादर
करण्यात आली. यानंतर महिलांच्या स्पर्धा
झाल्या. लोकनृत्यात प्रथम चाळीसगाव, द्वितीय
जळगाव, तृतीय रावेर, उत्तेजनार्थ बोदवड, किटी
पार्टीवर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम चोपडा, द्वितीय
रावेर, तृतीय जळगाव, उत्तेजनार्थ भुसावळ आले.
पिढी चांगली कशी तयार होणार यावर अभिनय
ः प्रथम बोदवड, द्वितीय जळगाव, तृतीय पाचोरा
आले. सूत्रसंचालन दीप्ती अग्रवाल यांनी केले.
आभार पूनम पटवारी यांनी मानले.


 
 
@@AUTHORINFO_V1@@