रणवीर सिंहला प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |

 
 
मुंबई : सिने क्षेत्रातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठेचा असा यंदाचा दादा साहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह याला जाहीर करण्यात आला आहे. नुकताच प्रदर्शित करण्यात आलेल्या 'पद्मावत' या चित्रपटातील त्याच्या "अल्लाउद्दीन खिलजी" या भूमिकेतील उत्तम सादरीकरणासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात येत आहे.
 
 
 
 
'पद्मावत' या चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच 'करणी सेना' या संस्थेने या चित्रपटाचा खूप विरोध केला. चित्रपट प्रदर्शित करण्यात येवू नये यासाठी देखील मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. मात्र अखेर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. यामधील अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत असलेल्या रणवीरच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले. आणि खलनायकाच्या भूमिकेत असून सुद्धा उत्तम अभिनयासाठी त्याला 'दादा साहेब पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.
 
"आपणास पद्मावत चित्रपटातील संस्‍मरणीय भूमिकेसाठी दादासाहेब फाळके उत्‍कृष्‍टता पुरस्‍कार २०१८ देताना आनंद होत आहे," असे पुरस्‍कार समितीने म्‍हटले आहे. दरम्यान अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला देखील निर्माती म्हणून दादा साहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 
@@AUTHORINFO_V1@@