बांबू उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून चंद्रपूरची ओळख बनवा- सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
बीआरटीसीच्या प्रदर्शनी व विक्री केंद्राचे उदघाटन
 
 
चंद्रपूर : चंद्रपूरच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने (बीआरटीसी) गेल्‍या दोन वर्षात अतिशय गतीने कामे सुरु केली आहे. बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या कार्यशाळा तसेच प्रशिक्षण शिबीर या माध्यमातून मोठा प्रशिक्षीत वर्ग जिल्हयात तयार होत असून रोजगार युक्त जिल्हयाकडे आम्ही वाटचाल करीत आहोत. भविष्यात बांबूपासून वस्तू बनविणारे शहर म्हणून चंद्रपूरची ओळख निर्माण करा, असे आवाहन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
 
 
 
चंद्रपूर येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य वनसरंक्षक कार्यालयाजवळील वन धन जन धन वस्तू विक्री केंद्राच्या अत्याधुनिक दालनाचे त्यांनी आज उदघाटन केले. कुठल्याही अद्ययावत विक्री केंद्राला शोभेल अशा या केंद्रामध्ये बांबूपासून तयार करण्यात आलेल्या विविध आकर्षक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये तिरंगा, बांबूपासून सायकल, तलवार, समई, आकाश दिवा तसेच अनेक शोभेच्या वस्तू या ठिकाणी विक्री व प्रदर्शनीसाठी मांडण्यात आल्या आहेत. चंद्रपूरमध्ये येणा-या पर्यटक आणि पाहुण्यांना चंद्रपूरचे वैशिष्टय व वेगळेपणा दाखविण्यासाठी हे केंद्र आकर्षण ठरणार आहे. बांबूपासून बनलेल्या अभिनव भेट वस्तूंनी हे केंद्र सज्ज आहे. या केद्राचे उदघाटन आज ना.सुधीर मुनगंटीवार यानी केले. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा उपस्थित होते. ना.सावरा यांना यावेळी ना.मुनगंटीवार यांनी कलाकुसर केलेला टेबल लॅम्प त्यांना भेट म्हणून दिला.
 
 
 
 
यानंतर रेंजर कॉलेज भागातील बांबू हॅन्डीक्राफ्ट ॲड आर्ट युनिट या निर्मिती आणि सामुहिक उपयोगिता केंद्राचे उदघाटन करण्यात आले. या ठिकाणी बांबूपासून विविध वस्तू बनविण्यासाठी आवश्यक असणा-या आधुनिक मशिन लावण्यात आल्या आहेत. मोठया प्रमाणात महिला बचत गटांना या ठिकाणी प्रशिक्षण दिल्या जात असून जिल्हयात चंद्रपूरनंतर विसापूर, मूल, पोंभूर्णा, जिवती, नागभिड, चिमूर या भागात सामुहिक उपयोगिता केंद्र लवकरच निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्हाभर प्रशिक्षण व निर्मितीचे वातावरण निर्माण होत आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@