भारोत्तोलन, नेमबाजीनंतर आता बॅडमिंटनमध्ये देखील भारताची सुवर्ण कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |

 
गोल्ड कोस्ट : गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी सुरुच आहे. भारोत्तोलन, नेमबाजीनंतर आता भारताने बॅडमिंटन या खेळात सुवर्ण पदक पटकावले आहे. मिश्र दुहेरी बॅडमिंटल स्पर्धेत भारताच्या सात्विक रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने बाजी मारली आहे. तसेच पुरुष एकल स्पर्धेत श्रीकांत किदांबी तर महिला एकल स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी सुवर्ण पदक पटकवत भारताचे नाव उंचावले.
 
 
 
 
 
मिश्र दुहेरी स्पर्धेत सात्विक आणि अश्विनी यांनी मलेशियाच्या संघाला ३-१ अशा अंकाने पराजित करत भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली. तसेच सायना हिने महिला एकल स्पर्धेत मलेशियाच्या सोनिया चेह हिला २१-११, १९-२१ आणि २१-९ अशा अंकाने पराजित करत विजय मिळवला.
 
 
 
 
या सर्व पदकांसह भारताला या राष्ट्रकुल खेळांमध्ये आतापर्यंत एकूण १० सुवर्ण पदके मिळाली आहेत. भारोत्तोलना, नेमबाजी, टेबलटेनिस सह इतर खेळांमध्ये देखील भारताची कामगिरी उत्तम आहे. भारताच्या सर्व खेळाडूंकडून संपूर्ण देशाला खूप अपेक्षा आहेत.
@@AUTHORINFO_V1@@