केडगाव हत्याकांड : भाजप आमदार कर्डिले यांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |

पोलीस अधिकारी परमार निलंबित, शिंदेंची चौकशी सुरु 


 

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथे नुकत्याच झालेल्या शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना आज नगर पोलिसांनी अटक केली आहे. शिवसैनिकांच्या हत्येचा कट रचणे तसेच पोलिसांच्या कार्यालयावर हल्ला करण्याच्या आरोपाखाली कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे. याच बरोबर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार आणि अतिरिक्त अधीक्षक अक्षय शिंदे यांच्यावर देखील कारवाई करत त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
 
आज सकाळी पोलिसांनी कर्डिले यांना त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली. तसेच अधिक चौकशीसाठी कडक सुरक्षा बंदोबस्तामध्ये त्यांना पोलीस ठाण्याकडे घेऊन जाण्यात आले. दरम्यान कर्डिले यांना आजच न्यायालयासमोर हजर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीमध्ये राजकीय वैमनस्यातून काही लोकांनी सेनेच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेस आणि भाजपच्या नेत्यांचा हात असल्याचे नंतर तपासात पुढे आले. यावर शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@