कर्नाटक निवडणुका : भाजपकडून ७२ उमेदवारांची यादी जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2018
Total Views |


नवी दिल्ली : अवघ्या एका महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या आगामी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक ज्येष्ठ नेत्यांची चर्चा करून एकूण ७२ उमेदवारांची नावे पक्षाने पहिल्या टप्प्यात जाहीर केली आहेत. यामध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडीयुरप्पा आणि माजी उपमुख्यमंत्री के.एस. ईश्वरप्पा यांच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल रात्री पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्ली येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये समितीची अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते. यावेळी राज्यातील एकूण १४० जागांवरील उमेदवारांसाठी चर्चा करण्यात आली. यानंतर पहिल्या टप्प्यात एकूण ७२ उमेदवार आणि त्यांच्या मतदारसंघांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये येडीयुरप्पा हे आपल्या शिकारीपुरा येथील मतदारसंघातून तर ईश्वरप्पा हे शिवमोगा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.



कर्नाटकातील सर्व २२८ जागांवर भाजप निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान कर्नाटकात सध्या सुरु असलेल्या 'लिंगायत कार्ड'च्या राजकारणावरून भाजप दुसऱ्या टप्प्यामध्ये लिंगायत समाजाच्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा देखील सध्या सुरु आहे.
@@AUTHORINFO_V1@@