वांद्र्यात साकारणार मुंबईतील पहिले शिवछत्रपती मंदिर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018
Total Views |


 

खा. पूनममहाजन यांच्या हस्ते शानदार भूमिपूजन सोहळा

 

मुंबई: हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण हिंदू समाजाचे आराध्य दैवत. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याही कानाकोपर्‍यात शिवरायांचे नाव घेतले की प्रत्येकजण नतमस्तक होतो. आता याच रयतेच्या राजाच्या शिवाजी महाराजांच्या मुंबईतील पहिल्या मंदिर उभारणीच्या कार्याला सुरुवात झाली असून भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा. पूनम महाजन यांच्या हस्ते रविवारी या मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पूर्ण झाला. शिवरायांच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा झाल्यानंतर खा. पूनम महाजन म्हणाल्या की, “छत्रपती शिवाजी महाराज हे काही कोणत्याही एका व्यक्तीचे वा एका पक्षाचे नाहीत. तर ते आपल्या सर्वांचेच आहेत. अवघ्या महाराष्ट्राचे आहेत. त्यांचे मंदिर बांधण्याचे सत्कार्य माझ्या हातून घडते, हे साक्षात शिवप्रभूंचेच आशीर्वाद आहेत.’’

वांद्रे पूर्व येथील सरकारी वसाहतीमध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांचे हे पहिलेवहिले मंदिर खा. पूनम महाजन यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. यावेळी मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी भाजप युवा कार्यकर्त्यांनी रायगडावरून माती तसेच तेथील तळ्यांमधील पाण्याने भरलेले कलश आणले होते. खा. पूनम महाजन यांनी रायगडावरील शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आणि पाणी कपाळाला लावून अत्यंत भावपूर्ण वातावरणात या मंदिराचे भूमिपूजन केले. या प्रसंगी वांद्रे पूर्व येथील महेश पारकर यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या उत्साहाने, उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@