निरोगी आरोग्यासाठी भुसावळकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018
Total Views |
 
निरोगी आरोग्यासाठी
 
भुसावळकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
-‘रन भुसावळ रन’ स्पर्धेत पंचाहत्तरी
ओलांडलेल्या स्पर्धकांचा सहभाग
जळगाव, ८ एप्रिल
निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित ‘रन भुसावळ रन’ स्पर्धेला भुसावळकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तीन गटात सहभागी असलेल्या एक हजार २५० स्पर्धकांसह शहरवासियांनी स्पर्धेत सहभागी होवून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. पहाटेच्या आल्हाददायी वातावरणात पार पडलेल्या व अत्यंत काटेकोर नियोजन असलेल्या स्पर्धेनेे भुसावळकरांचा आनंद द्विगुणीत झाला. भुसावळ शहरात प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन केल्याने शहरवासीयांनी आयोजकांचेही स्वागत करुन धन्यवाद दिले. बारा वयोगटाच्या स्पर्धकापासून ७५ ओलांडलेल्या स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. तीन, पाच व दहा किलोमीटर अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात आली होती.
तीन, पाच आणि दहा किलोमीटर स्पर्धा
‘रन भुसावळ रन’ ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. सुरुवातीला दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भुसावळचे आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, नगराध्यक्ष रमण भोळे, सिद्धीविनायक गृपचे संचालक कुंदन ढाके, सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्पर्धेच्या सुरुवातीला हिरवी झेंडा दाखवून उद्घाटन केले. यानंतर पाच आणि तीन किलोमीटर अंतराच्या गटासाठी स्पर्धेला सुरुवात झाली.
 

 
सहभागी स्पर्धेला गुडी बॅग, प्रमाणपत्र
स्पर्धेत प्रत्येक सहभागी स्पर्धकाला गुडी बॅग आणि प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना कुठलाही त्रास होवू नये यासाठी शहरातील विविध मार्गावर चोख बंदोबस्त तैनात करुन वाहतूक थांबवण्यात आली होती. शिवाय महामार्गावरील वाहतूकही काही वेळासाठी पोलिसांनी थांबवली. स्पर्धकांसाठी रस्त्यावर रुग्णवाहिका तसेच पाणी व लिंबू सरबताची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण स्पर्धेवर ड्रोन कॅमेर्‍याचीही नजर होती. आरएफआयडी तंत्रज्ञानामुळे स्पर्धकांचे काटेकोर निरीक्षण करता आले व त्यामुळे किती मिनीट व सेकंदात स्पर्धकाने अंतर कापले याचे निरीक्षण नोंदवून त्यातून विजेते ठरवण्यात आले.
‘रन भुसावळ रन’साठी यांचे परिश्रम
सहाय्यक पोलिस अधीक्षक निलोत्पल, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले, उपनिरीक्षक विशाल पाटील, नियोजन समितीचे यतीन ढाके, अजय भोळे, विकास पाचपांडे, मनोज पिंगळे, प्रा.प्रवीण फालक, शुभम महाजन, मनीष नेमाडे, डॉ.तुषार पाटील, क्रिडा शिक्षक रमण भोळे, रवी निमाणी, समीर पाटील, अनिल चौधरी, वरुण इंगळे, नितीन धांडे आदींनी परिश्रम घेतले.
 


 
स्पर्धेतील तीन्ही गटनिहाय विजेते
तीन किलोमीटर
१) प्रथम- प्रथम व्यवहारे (१०.१), द्वितीय - ऋषीकेश पाटील (१०.१५), तृतीय- संभाजी पाटील (१०.४००),
२) सिनीयर सिटीजन प्रथम - प्रकाश तायडे (२३.१०), द्वितीय - प्रेमराज लढे (२३.१३), तृतीय - लिलाधर अग्रवाल (२४.५३)
३) महिला प्रथम - मोहिनी जगदाडे (११.२०).
पाच किलोमीटर
१) महिला प्रथम - मय्यमा जोसेफ (२४.१२),
२) पुरुष प्रथम - मयुर सोनवणे (१७.१८), द्वितीय- राहुल पाटील (१७.२४), तृतीय - उमेश पाटील (१७.२८).
दहा किलोमीटर
१) महिला प्रथम - अश्‍विनी काटोळे (४३.२७)
२) पुरुष प्रथम - विशाल कुंभार (३४.५६), द्वितीय - अमोल पाटील (३७.११), तृतीय - सतीश शेजवळ (४०.४१). मिनिटांमध्ये कंसात दिलेले अंतर पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@